CBSE term 1 exam tips and tricks for MCQ : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) इयत्ता 10 ची MCQ आधारित टर्म 1 परीक्षा 30 नोव्हेंबर 2021 पासून सुरू होणार आणि 11 डिसेंबर 2021 पर्यंत चालणार आहे. परीक्षेच्या शेवटच्या काही दिवसांत विद्यार्थ्यांनी त्वरीत आणि अचूक उजळणी करावी. विषयांची तयारी करताना काही खास युक्त्या लक्षात ठेवल्या तर कमी वेळात आत्मविश्वास निर्माण होतो. अनेक विद्यार्थी नवीन परीक्षेच्या पॅटर्नबाबत सिरियस नसतात. MCQ पॅटर्न सोपे समजणे ही मोठी चूक असेल. अशी चूक करू नका. प्रश्नपत्रिका बहुपर्यायी पद्धतीवर आधारित असल्याने अतिशय काळजीपूर्वक वस्तुस्थिती हाताळण्याची गरज आहे.