CBSE Result 2021 Date: सीबीएसई बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली? या दिवशी निकालाची घोषणा

CBSE Result 2021 Date: सीबीएसई बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली?  या दिवशी निकालाची घोषणा
सीबीएसई

विशेष मूल्यांकन सूत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या निकालावर समाधानी नसलेल्या, खासगी आणि श्रेणी सुधारणा करण्यासाठी परीक्षा बोर्डाने घेतलेल्या ऑफलाइन विशेष परीक्षेचा निकाल बोर्ड ऑनलाईन जाहीर करेल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Sep 27, 2021 | 11:34 AM

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई 30 सप्टेंबर रोजी सीबीएसई 12 वी बोर्डाचा निकाल 2021 जाहीर करणार आहे. विशेष मूल्यांकन सूत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या निकालावर समाधानी नसलेल्या, खासगी आणि श्रेणी सुधारणा करण्यासाठी परीक्षा बोर्डाने घेतलेल्या ऑफलाइन विशेष परीक्षेचा निकाल बोर्ड ऑनलाईन जाहीर करेल. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in. Cbse.gov.in वर लवकरच अधिसूचना जारी करण्यात येईल.

कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल 30 सप्टेंबरपूर्वी देखील जाहीर केला जाऊ शकतो. सीबीएसई बोर्डाने सांगितले होते की, 12 वीचा निकाल 30 तारखेपर्यंत जाहीर होईल. मिळालेल्या माहितीनुसार उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झाली असून निकालाची अंतिम प्रक्रिया सुरु आहे. तसेच, बोर्ड दहावी आणि बारावीचे दोन्ही निकाल लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा सीबीएसई 12 वीचा निकाल जाहीर करु शकते.

CBSE 12 वी निकाल पाहण्यासाठी अन्य पर्याय

CBSE 12 वी निकाल पाहण्यासाठी अन्य पर्याय आहेत. यामध्ये डिजीलॉकर, SMS, ई मेल, उमंग मोबाईल अॅप, आयव्हीआरएस याद्वारे निकाल पाहू शकता.

Digi locker

डिजीलॉकर एक ऑनलाईन क्लाऊड सॉफ्टवेअर आहे. यामध्ये आपण निकाल चेक करुन मार्कशीटही डाऊनलोड करु शकता. त्यासाठी तुम्हाला डिजीलॉकर वेबसाईटवर जाऊन ‘View result’ वर क्लिक करा. तिथे तुमचा रोल नंबर टाका, क्लास निवडा आणि अॅडमिट कार्ड टाका. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. विद्यार्थ्यांना निकाल डाऊनलोड करुन प्रिंटही काढता येऊ शकेल.

DigiLocker वरुन असे डाउनलोड करा मार्कशीट

– सीबीएसई बारावीचा निकाल DigiLocker app द्वारे डाउनलोड करु शकता.
– सर्वप्रथम आपण digilocker.gov.in वर जा.
– वेबसाइटच्या ‘education’ सेक्शनमध्ये जा आणि Central Board of Secondary Education वर क्लिक करा.

SMS आणि IVRS

विद्यार्थी SMS नेही आपला निकाल पाहू शकतात. मोबाईलवरुन spacespace हा तपशील भरुन 7738299899 या नंबरवर SMS करा. निकाल जाहीर झाल्यानंतर यावर निकाल मिळू शकेल.

याशिवाय IVRS द्वारेही निकाल ऐकायला मिळू शकतो. त्यासाठी 011-24300699 नंबरवर कॉल करा.

30 सप्टेंबरपर्यंत निकाल जाहीर होणार

सीबीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, सर्व विद्यार्थ्यांसाठी कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल 30 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होईल. सर्व विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याची समान संधी मिळावी यासाठी हे केले जात आहे. दिल्ली विद्यापीठ, डीयूने त्याची कट ऑफ 1 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली होती. दरम्यान, सीबीएसईने सीबीएसई 10 वी 12 वी बोर्ड परीक्षा 2021-22 साठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे.

इतर बातम्या:

UGC NET 2021 Admit Card: नेट परीक्षेचं प्रवेशपत्र डाऊनलोड कसं करायचं? 6 ऑक्टोबरपासून परीक्षेला सुरुवात

यूपीएससी परीक्षेत बार्टीचा झेंडा, 9 विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या खास शुभेच्छा

UPSC Result 2021 | युपीएससीत लातूरच्या सेव्हनस्टार्सचे अभूतपूर्व यश, जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

CBSE would be releasing the CBSE Class 12 Board compartment exam Result 2021 on September 30

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें