AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EWS साठी 5 एकराच्या अटीनं नवं संकट; मराठवाडा विदर्भ ते उत्तर महाराष्ट्रातील विदर्भातील शेतकऱ्यांना फटका, वाचा सविस्तर

केंद्राकडून 8 लाख उत्पन्न मर्यादा निश्चित करताना लागू करण्यात आलेली 5 एकर जमीन मर्यादेची अट महाराष्ट्रातील शेतकरी आणि त्यांच्या मुलांसाठी नुकसानकारक ठरणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्राला 5 एकरांची अट वगळण्याची मागणी केलीय.

EWS साठी 5 एकराच्या अटीनं नवं संकट; मराठवाडा विदर्भ ते उत्तर महाराष्ट्रातील विदर्भातील शेतकऱ्यांना फटका, वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jan 04, 2022 | 11:20 AM
Share

मुंबई: केंद्र सरकारनं सोमवारी सुप्रीम कोर्टात ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी आठ लाख रुपये उत्पन्न मर्यादा कायम ठेवल्याची माहिती दिली. केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये आठ लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा काय ठेवण्यामागील भूमिका मांडली आहे. नीट पीजी आरक्षणातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 8 लाख उत्पन्न मर्यादा कशी ठेवण्यात आली, अशी विचारणा सुप्रीम कोर्टानं केली होती. केंद्राकडून 8 लाख उत्पन्न मर्यादा निश्चित करताना लागू करण्यात आलेली 5 एकर जमीन मर्यादेची अट महाराष्ट्रातील शेतकरी आणि त्यांच्या मुलांसाठी नुकसानकारक ठरणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्राला 5 एकरांची अट वगळण्याची मागणी केलीय. पाच एकराच्या अटीमुळं विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी पुत्रांवर मोठा अन्याय होणार आहे.

नव्या निकषांनुसार EWS मधून कुणाला वगळलं जाणार

आठ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येणार नाही. पाच एकर शेतजमीन किंवा त्याहून अधिक शेतजमीन असणारे शेतकरी कुटुंब, अधिसूचित नगरपालिका आणि महापालिकांमधील 100 चौ. फूट किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्राचा प्लॉट आणि अधिसूचित नसलेल्या नगरपालिकांमधील 200 चै. फूट प्लॉट नावावर असणारे व्यक्ती आणि ज्यांच्याकडे 1 हजार स्क्वेअर फुट किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रावरील घर असेल त्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ मिळणार नाही.

नव्या निकषामुळं मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं नुकसान

आर्थिक दृष्ट्या मागास 10 टक्के आरक्षणासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या समितीने 5 एकर जमीन धारणेची अट प्रस्तावित केली आहे. या नव्या निकषामुळं महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या समाजघटकावर अन्याय करणारी आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जमीन धारणा क्षेत्र हे पाच एकरांहून अधिक असलं तरी दुष्काळ आणि कोरडवाडू शेती यासारख्या कारणांमुळं शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळत नाही. नव्या निकषामुळं प्रचलित आरक्षण न मिळणाऱ्या शेतकरी कुटुंबातील मुलांना नव्या अटीमुळं ईडब्ल्यूएसपासून वंचित राहावं लागणार आहे. महाराष्ट्रात 1 कोटी 52 लाख 85 हजार 439 खातेधारक शेतकरी आहेत. त्यापैकी 1 कोटी 20 लाख शेतकरी अल्पभूधारक आहेत. म्हणजेच नव्या निकषाचा फटका जवळपास 32 लाख खातेधारक शेतकऱ्यांना बसणार आहे.

अशोक चव्हाण यांची निकष बदलण्याची मागणी

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागात एकत्र कुटूंब पद्धतीमुळे जमीनधारणेचे प्रमाण जास्त आहे. मात्र, 5 एकरपेक्षा जास्त जमीन असली तरीही या भागातील बहुतांश शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रूपयांपेक्षा कमीच आहे. त्यामुळे आजमितीस आरक्षणाचा लाभ मिळत नसलेल्या मराठा समाजासह इतर समाजांना मोठे नुकसान सोसावे लागेल, असं मत अशोक चव्हाण यांनी मांडलं आहे.

सुप्रीम कोर्टात सुधारित प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मागणी

केंद्र सरकारने तज्ज्ञ समितीच्या या अन्याय्य शिफारसीचा फेरविचार करून तातडीने सर्वोच्च न्यायालयात सुधारित प्रतिज्ञापत्र दाखल करावे, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकरी कुटुंबातील पाल्य मोठ्या प्रमाणात आर्थिक दृष्ट्या मागास आरक्षणापासून वंचित राहतील, हे अशोक चव्हाण यांनी केंद्राच्या निदर्शनास आणून दिलं आहे.

इतर बातम्या:

देशी अन् गोल्डन सीताफळाची चवच न्यारी, मुख्य पिकातून नाही पण हंगामी पिकांतून शेतकऱ्यांचे वाढले उत्पन्न

PDCC Bank Election: पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या सातपैकी तीन जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात, इतर जागांची मतमोजणी सुरू

Center new criteria about EWS Reservation will impact Marathwada Vidarbha and North Maharashtra Farmers

Follow Us
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री?
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री? मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीत...
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना सूचना
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना महत्त्वाच्या सूचना... मोठी अपडेट समोर
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक