देशी अन् गोल्डन सीताफळाची चवच न्यारी, मुख्य पिकातून नाही पण हंगामी पिकांतून शेतकऱ्यांचे वाढले उत्पन्न

देशी अन् गोल्डन सीताफळाची चवच न्यारी, मुख्य पिकातून नाही पण हंगामी पिकांतून शेतकऱ्यांचे वाढले उत्पन्न
संग्रहीत छायाचित्र

हंगामाच्या सुरवातीला शेतीमालाचे दर तसे नियंत्रणातच असतात. त्यानंतर मात्र, मागणीवरच सर्वकाही अवलंबून असते. सीताफळाने हंगाम सुरु झाल्यापासून बाजारपेठेत एक वेगळेच महत्व टिकून ठेवलेले आहे. गणेशोत्सवापासून सुरु झालेला हंगाम आता अंतिम टप्प्यात असतानाही वाशीतील घाऊक बाजारात आवक तर मोठ्या प्रमाणाक होत आहे शिवाय दरही टिकून आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Jan 04, 2022 | 11:07 AM

वाशी : हंगामाच्या सुरवातीला शेतीमालाचे दर तसे नियंत्रणातच असतात. त्यानंतर मात्र, मागणीवरच सर्वकाही अवलंबून असते. (Increase in Custard Apple) सीताफळाने हंगाम सुरु झाल्यापासून बाजारपेठेत एक वेगळेच महत्व टिकून ठेवलेले आहे. गणेशोत्सवापासून सुरु झालेला हंगाम आता अंतिम टप्प्यात असतानाही (Washi Market) वाशीतील घाऊक बाजारात आवक तर मोठ्या प्रमाणाक होत आहे शिवाय दरही टिकून आहेत. विशेषत: देशी आणि गोल्डन जातीच्या सीताफळाला अधिकची मागणी असून आता शेवटच्या टप्प्यात या सीताफळाचे दर हे 150 ते 200 रुपये किलोवर गेले आहेत. तरीही या सीताफळांची चवच न्यारी असल्याने मागणीत वाढ होत आहे.

सीताफळामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही ‘गोडवा’

आतापर्यंत अवकाळी, रोगराईमुळे सर्वच पिकांचे आणि फळांचे नुकसान झालेले आहे. पावसाच्या फटका सीताफळ उत्पादनावरही झालेला आहे. मात्र, तो कमी प्रमाणात असल्याने हंगामाच्या सुरवातीपासूनची आवक आजही कायम आहे. उशिरा का होईना सुरु झालेली आवक आज शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरत आहे. देशी सीताफळाला 200 ते 250 व गोल्डन सीताफळाला 150 रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही भर पडलेली आहे. शिवाय ग्राहकांची पसंती या दोन सीताफळांनाच असल्याने मुख्य पिकांतून नाही पण सीताफळासारख्या हंगामी पिकातून का होईना चार पैसे शेतकऱ्यांना मिळाल्याच समाधान आहे.

परजिल्ह्यातील सीताफळ वाशीच्या मार्केटमध्ये

वाशी येथील घाऊक बाजारात दिवसाकाठी 4 ते 5 टेम्पो सीताफळाची आवक होत असल्याचे दै. सकाळमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. नाशिक, जुन्नर, सासवड, नगर आणि कर्नाटक येथून सीताफळाची आवक होत आहे. यंदा पावसामुळे सीताफळाची आवक ही पावसामुळे उशिरा सुरु झाली होती. त्यामुळे अणखीन काही दिवस अशीच आवक राहिली तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. सीताफळांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

सोलापूर, सांगोल्याची बोरं परदेशात, हंगामी फळातून वाढले उत्पन्न

मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत बोरांची आवक सुरु झाली आहे. दिवसाकाठी वाशी बाजार समितीमध्ये 8 ते 10 हजार किलो बोरांची आवक सुरु आहे. यामध्ये सर्वाधिक बोरांची आवक ही सोलापूर आणि सांगोल्यातून आहे. बोरांसाठी आवश्यक असलेला पाऊस यंदा वेळेत झाल्याने बोरं उत्पादनाच्या बाबतीत सर्वकाही वेळेत होत आहे. हिरवी, केशरी, उमराण, पोपटी रंगाची, अॅपल बोरं, आंबट गोड अशा सर्व प्रकारची बोरं नववर्षाच्या सुरवातीलाच दाखल झालेली आहेत. उमराण 10 ते 15 रुपये किलो, चमेली बोरं 20 ते 25 रुपये तर अॅपल बोरे 30 ते 40 रुपये किलो विकली जात आहे. त्यामुळे मुख्य पिकांचे पावसामुळे नुकसान झाले असले तरी हंगामी पिकांनी कसर भरुन काढली आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season : वेळेत पूर्वसूचना दाखल करा तरच मिळणार नुकसानभरपाई, काय आहेत कृषी संचालकांच्या सुचना ?

Winter : थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक मात्र, ‘या’ फळ बागेसाठी आहे धोक्याची घंटा, शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला

Intercropping : उन्हाळी हंगामात दुहेरी उत्पादन, शेतकऱ्यांनी ‘असा’ साधला मधला मार्ग

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें