AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावीनंतर पुढं काय? भाषांतर क्षेत्रातील अभ्यासक्रम आणि करिअरच्या संधी

तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील प्रगतीमुळे जग आपल्या जवळ आलंय असं आपण म्हणतो. जागतिकीकरणानंतर अनेक बहूराष्ट्रीय कंपन्या भारतात स्थापन झाल्या. भारतासारखा बहूभाषिक देशामध्ये भाषांतरकाराची गरज मोठ्या प्रमाणावर लागते.

बारावीनंतर पुढं काय? भाषांतर क्षेत्रातील अभ्यासक्रम आणि करिअरच्या संधी
exam
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 9:50 AM
Share

मुंबई: तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील प्रगतीमुळे जग आपल्या जवळ आलंय असं आपण म्हणतो. जागतिकीकरणानंतर अनेक बहूराष्ट्रीय कंपन्या भारतात स्थापन झाल्या. भारतासारखा बहूभाषिक देशामध्ये भाषांतरकाराची गरज मोठ्या प्रमाणावर लागते.भाषांतरकाराचं मुख्य काम हे एका भाषेतील माहिती किंवा मूळ मजकूर दुसऱ्या भाषेत भाषांतरित करणं आवश्यक असतं. भाषांतरकारानं अचूकरित्या एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत कोणताही अर्थ न बदलता करण गरजेचं असतं. भाषांतर करुन चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळवू शकता. तर, स्वत: भाषांतराची काम घेऊन चांगले पैसे मिळवता येतात.

पात्रता:

एखाद्या विद्यार्थ्याला भाषांतरकार म्हणून काम करायचं असल्याला त्यानं संबंधित भाषा विषयातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाचं उत्तीर्ण होणं आवश्यक आहे.

भाषांतर अभ्यासक्रम

भाषांतर अभ्यासक्रमाचे तीन प्रकार आहेत. विद्यार्थी प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदवी अभ्यासक्रम, पदविका अभ्यासक्रम करु शकतात. प्रमाणपत्र आणि पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याची किमान पात्रता बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर, पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. देशभरातील विविध विद्यापीठात भाषांतराचे अभ्यासक्रम चालवले जातात. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या दुरस्थ शिक्षण विभागातर्फे भाषांतर अभ्यासक्रम चालवला जातो.

भाषांतरकार म्हणून संधी

भाषांतराचंयोग्य शिक्षण आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी विविध क्षेत्रात भाषांतरकार म्हणून काम करु शकतात. आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील भाषांतरकार, कायदेशीर आणि न्यायालयीन क्षेत्रातील भाषांतरकार, ग्रंथालयातील भाषांतरकार या क्षेत्रात काम करता येऊ शकतं. सॉफ्टवेअर, वृत्तपत्रं, मासिक, शैक्षणिक सेवा, रुग्णालय, पर्यटन, हॉटेल, प्रदर्शन, रेडिओ इत्यादी ठिकाणी नोकरीच्या संधी मिळू शकते.

पगार किती मिळतो?

भाषांतरकार म्हणून काम करताना पदानुसार आणि अनुभवानुसार 18 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत पगाराच्या नोकरी विविध ठिकाणी मिळते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं भाषांतर करण्यांची गरज वाढलेली आहे. नवनव्या कंपन्या भारतात दाखल होत असल्यानं भाषांतरकारांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळू शकतात.

इतर बातम्या

पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती सरळसेवेनं करा, डी.एड. बी.एड. धारक आदिवासी विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण

Maharashtra TET 2021: टीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यास उरले 2 दिवस, अर्ज कुठे करायचा? वाचा सविस्तर

पुण्यात ‘डॉ. सायरस पूनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटर’ची स्थापना, कौशल्यविकास कोर्सेसचं प्रशिक्षण, असा घ्या प्रवेश

Courses in after class 12 scope of translation courses

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.