AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC HSC Exams 2021 : वर्षा गायकवाडांनी ठासून सांगितलं, काठिण्य पातळी गौण, आमची तयारी झालीय!

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी विधानसभेत ठणकावून (Maharashtra Vidhan Sabha) सांगितलं.

SSC HSC Exams 2021 : वर्षा गायकवाडांनी ठासून सांगितलं, काठिण्य पातळी गौण, आमची तयारी झालीय!
वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री
| Updated on: Mar 05, 2021 | 1:50 PM
Share

SSC HSC Exams 2021 मुंबई : यावर्षी परीक्षा होणारच आहे, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी विधानसभेत ठणकावून (Maharashtra Vidhan Sabha) सांगितलं. आमची प्राथमिकता मुलांच्या आरोग्याला आहे. त्यामुळे सर्व काळजी घेऊनच आम्ही परीक्षा घेणार आहोत, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. दहावीच्या, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन घेतली होती. दोन महिने दहावी, बारावीच्या प्रश्नपत्रिका वितरणासाठी लागतात, त्यामुळे ती प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. त्यामुळे काठिण्य पातळीबाबत उपस्थित केलेला मुद्दा आता गौण आहे. भौगोलिक स्थिती बघून आपण टाईमटेबल ठरवलं आहे, असं वर्षा गायकवाड विधानसभेत म्हणाल्या.

दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी कालही याबाबत सविस्तर माहिती दिली होती. “ऑगस्टला आम्ही सिलॅबस कमी करून नोव्हेंबरमध्ये बोर्डाचा पेपर पॅटर्न ठरतो, त्याची तपासणी करायचं ठरतं. त्यात गावखेड्यात पेपर पोहोचवायला कमीत कमी दोन महिने लागतात. हे सगळं करत असताना बोर्डाला सुद्धा वेळ लागतो, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

परीक्षा ऑफलाईनच होणार

याबाबत वर्षा गायकवाड म्हणाल्या, “कोरोनाची परिस्थिती आहे त्यात मुलांचं आरोग्य, सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. खूप साऱ्या तज्ज्ञांशी शिक्षण विभाग बोलत आहे. सध्यातरी जी दहावी-बारावी बोर्डाची तारीख दिली आहे त्यानुसारच परीक्षा या ऑफलाईनच होणार आहे”

ऑगस्टला आम्ही सिलॅबस कमी करून नोव्हेंबरमध्ये बोर्डाचा पेपर पॅटर्न ठरतो, त्याची तपासणी करायचं ठरतं. त्यात गावखेड्यात पेपर पोहोचवायला कमीत कमी दोन महिने लागतात. हे सगळं करत असताना बोर्डाला सुद्धा वेळ लागतो.

बोर्ड परीक्षा पॅटर्नबाबत मागणी केली जातीय ? याबाबत निर्णय घेणार ?

बोर्डाच्या परीक्षांबाबत सूचना, मागण्या काही लोकांनी दिल्या आहेत. मात्र,पेपर पॅटर्न आणि त्यानुसार मार्क्स असतात आणि पेपर त्यानुसार तयार केलेले असतात. त्यात काही गोष्टींची आवश्यकता असेल तर तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

संबंधित बातम्या  

EXCLUSIVE : दहावी- बारावी बोर्ड परीक्षांबाबत काय विचार केला जातोय?

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.