JEE Main 2022: मित्रो! ॲडमिट कार्ड के तरफ ध्यान दे…’या’ अधिकृत वेबसाइटला भेट द्या

सत्र 1 ची परीक्षा 20 ते 29 जून 2022 दरम्यान होणार आहे. त्याचबरोबर सत्र 2 ची परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. जेईई मेन सत्र 2 साठी, उमेदवार 30 जून 2022 पर्यंत एनटीए अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात.

JEE Main 2022: मित्रो! ॲडमिट कार्ड के तरफ ध्यान दे...'या' अधिकृत वेबसाइटला भेट द्या
ॲडमिट कार्ड के तरफ ध्यान दे.Image Credit source: JEE Official Website
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 3:25 PM

JEE Main 2022 Admit Card: संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Main) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच जेईई मेन 2022 च्या फेज 1 परीक्षेचे ॲडमिट कार्ड (JEE Main Admit Card 2022) आपल्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करणार आहे. एनटीएच्या अधिकृत वेबसाइटवर jeemain.nta.nic.in जाऊन विद्यार्थ्यांना त्यांचे ॲडमिट कार्ड तपासता आणि डाउनलोड करता येणार आहे. जेईई मेनच्या जून सत्रासाठी परीक्षा, शहरांची माहिती एनटीएकडून येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ॲडमिट कार्डमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी देण्यात येणाऱ्या स्लॉटची माहिती असेल. एक ते दोन दिवसांत जेईई मेनचे ॲडमिट कार्ड जारी केले जाऊ शकते. ही परीक्षा 20 जून 2022 पासून घेण्यात येणार आहे. सुमारे 10 दिवस या परीक्षा चालणार आहेत. या परीक्षेला आता जवळपास आठवडाभराचा अवधी उरला आहे.

ॲडमिट कार्ड लवकरच जारी होणार

मीडिया रिपोर्टनुसार, जेईई मेनचे ॲडमिट कार्ड एक ते दोन दिवसांत जारी केले जाऊ शकते. एनटीए जर जेईई मेनचे ॲडमिट कार्ड अधिकृतपणे जारी करणार असेल तर उमेदवार जेईई मेन 2022 चे ॲडमिट कार्ड nta.ac.in अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकतात.

ही परीक्षा दोन सत्रात होणार आहे

जेईई मेन 2022 ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येत आहे. सत्र 1 ची परीक्षा 20 ते 29 जून 2022 दरम्यान होणार आहे. त्याचबरोबर सत्र 2 ची परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. जेईई मेन सत्र 2 साठी, उमेदवार 30 जून 2022 पर्यंत एनटीए अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात.

हे सुद्धा वाचा

असे डाऊनलोड करा ॲडमिट कार्ड

  1. ॲडमिट कार्ड (जेईई मेन 2022 हॉल तिकीट) डाऊनलोड करण्यासाठी jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. होमपेजवर देण्यात आलेल्या ॲडमिट कार्डच्या (JEE Main Admit Card) लिंकवर क्लिक करा.
  3. आता तुम्हाला तुमची ओळखपत्रे प्रविष्ट करावी लागतील, जसे की अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख.
  4. ॲडमिट कार्ड (JEE mains admit card phase 1) स्क्रीनवर दिसेल.
  5. ॲडमिट कार्डमध्ये परीक्षेची तारीख आणि वेळ तपासा. डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.
Non Stop LIVE Update
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी.
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?.