AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Education : ‘सदर’ निधी शिक्षणासाठीच खर्च करावा! उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

सदर निधी शिक्षणासाठीच खर्च करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संबंधित अधिकारी वर्गांना दिले. डहाणू येथील अदाणी पावर येथे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

Education : 'सदर' निधी शिक्षणासाठीच खर्च करावा! उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश
उपमुख्यमंत्री अजित पवारImage Credit source: Twitter
| Updated on: May 20, 2022 | 5:51 PM
Share

पालघर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद (Zilha Parishad) अंतर्गत येणाऱ्या शाळा (Schools) तसेच शासकीय आश्रम शाळा मध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे आवश्यक असून शाळेचा दर्जा वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्यामुळे जिल्हा नियोजन समिती मार्फत 5 टक्के निधी शिक्षणासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे सदर निधी शिक्षणासाठीच खर्च करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संबंधित अधिकारी वर्गांना दिले. डहाणू येथील अदाणी पावर येथे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

‘कुपोषण जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी…’- उपमुख्यमंत्री

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदही वाढाण,खासदार राजेंद्र गावित सर्वश्री आमदार सुनील भुसारा, विनोद निकोले श्रीनिवास वंनगा जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ, सहाय्यक जिल्हाधिकारी आयुशी सिंह, अशिमा मित्तल आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कुपोषण जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी आदिवासी भागात जनजागृती करून आदिवासी बांधवांना रोजगार किंवा नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी वित्तीय संस्थांनी अर्थ साहाय्य करणे गरजेचे आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

सर्व शासकीय यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवणे आवश्यक – उपमुख्यमंत्री

जिल्ह्यामध्ये विकास कामे करत असताना सर्व शासकीय यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवणे आवश्यक आहे. यामुळे जिल्ह्यातील विकास कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्याला वैभवशाली संस्कृती लाभली असून विकास कामे करताना संस्कृती,परंपरा यांना धक्का न लागताविकास कामे वेळेत पूर्ण करावे. विकासकामे नागरिकांच्या सुविधेकरिता असल्यामुळे विकास कामे करताना स्थानिक नागरिकांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊनच करावीत. शासकीय जागेवर विकास काम सुरू असताना विनाकारण जर कोणी अडथळा निर्माण करत असेल तर अशा मनोवृत्ती विरुद्ध योग्य ती कारवाई करावी असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. यावेळी दि डहाणू रोड जनता को-ऑपरेटिव बँकेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.