दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UGC कडून गाइडलाइन! विद्यार्थ्यांना खुशखबर

सीबीसीएस हे एक शैक्षणिक मॉडेल आहे. सीबीसीएस म्हणजे चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टिम.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UGC कडून गाइडलाइन! विद्यार्थ्यांना खुशखबर
UGC NET city slipImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 1:18 PM

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलीयेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दिव्यांग विद्यार्थ्यांना आता एकावेळी अनेक कोर्स करता येणार आहेत. मार्गदर्शक तत्त्वांवर यूजीसीच्या मॉनिटरिंग पोर्टलवर आयोगाने सर्व भागधारकांकडून 25 ऑक्टोबरपर्यंत सूचना मागवल्या आहेत. सीबीसीएस हे एक शैक्षणिक मॉडेल आहे. सीबीसीएस म्हणजे चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टिम. हे शैक्षणिक मॉडेल विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे अभ्यासक्रम आणि विषय निवडण्याची संधी देते.

दिव्यांग विद्यार्थी आपल्या आवडीचे एकापेक्षा अधिक अभ्यासक्रम चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टिम अर्थात सीबीसीएसमधून चॉइस करू शकतात असं या नोटिशीत म्हटले आहे.

कोअर, इलेक्टिव्ह कोर्सेस, ओपन किंवा ग्लोबल इलेक्टिव्ह्ज आणि स्किल बेस्ड कोर्सेस हे कोर्सेस विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सुरू केलेत. याशिवाय युजीसीकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलीत ज्यात विद्यार्थ्यांसाठी काही गोष्टींची खास काळजी घेण्यात आलीये.

यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काय म्हटलंय?

  1. उच्च शिक्षण संस्थांच्या कॅम्पसमध्ये वॉक वे शी संबंधित मूलभूत सुविधा निर्माण करण्यास सांगण्यात आलंय.
  2. कॅम्पसमध्ये दुतर्फा वॉक वे बांधण्यास सांगण्यात आलंय.
  3. कॅम्पसमध्ये रस्त्याच्या सभोवताली बसण्याची व्यवस्था, लेव्हल क्रॉसिंग आणि पुरेशी लाईटची व्यवस्था असावी.
  4. पादचाऱ्यांना अडथळा येणार नाही अशा पद्धतीने रस्त्यांबरोबरच ३० मीटरवर कॅम्पसमध्ये बसण्याची योग्य व्यवस्था असावी.
  5. नेव्हिगेशन सुविधेसाठी कॅम्पसमध्ये जीपीएस मॅपिंग आणि ब्लूटूथ तंत्रज्ञानाची व्यवस्था केली जाऊ शकते.
  6. कॅम्पसमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल इंडिकेटर यंत्रणा बसवली जाऊ शकते.
  7. सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी संबंधित गोष्टी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात, असे यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.