AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agneepath Recruitment Scheme : 30 हजार पगार, 40 लाख इन्शूरन्स आणि 4 वर्ष नोकरी! अग्निवीरांना आणखी काय काय मिळणार?

भारतीय सशस्त्र दलात भरतीसाठी एक नवीन योजना सुरू होणार आहे. याला टूर ऑफ ड्युटी 'अग्निपथ' असे नाव देता येईल.

Agneepath Recruitment Scheme : 30 हजार पगार, 40 लाख इन्शूरन्स आणि 4 वर्ष नोकरी! अग्निवीरांना आणखी काय काय मिळणार?
भारतीय सैन्यदलImage Credit source: dnaindia.com
| Updated on: Jun 14, 2022 | 2:10 PM
Share

नवी दिल्ली : अनेक तरुणांचं देशासाठी काम करण्याचं स्वप्न असतं. ते त्यासाठी वेगवेगळ्या संधी शोधत असता, वेगवेगळ्या योजनाही (scheme) बघतात. यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म देखील आहे. मात्र, आम्ही तुम्हाला भारतीय सैन्यदलाच्या (Indian Armed Forces) एका खास योजनेची माहिती देणार आहोत. ती योजना आम्ही तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगणार आहोत. ती योजना काय आहे. भारतीय सशस्त्र दलात भरतीसाठी एक नवीन योजना सुरू होणार आहे. याला टूर ऑफ ड्युटी ‘अग्निपथ’ असे नाव देता येईल. एक वेबसाईटच्या वृत्तानुसार, ही योजना सुरू आहे. याअंतर्गत चार वर्षांसाठी सैनिकांची भरती केली जाईल, ज्यांना अग्निवीर म्हटले जाईल. ही भरती आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीमधील अधिकाऱ्यांच्या पदापेक्षा कमी असेल. याअंतर्गत 21 वर्षांपर्यंतच्या तरुणांना घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या (Corona) काळात लष्करातील भरतीची प्रक्रिया गेल्या दोन वर्षांपासून थंडावली होती. त्यामुळे ही योजना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

10 पॉइंट्समध्ये समजून घ्या योजना

  1. या योजनेंतर्गत तरुण सैनिकांना चार वर्षांसाठी भारतीय लष्करात कामावर घेतले जाईल.
  2. चार वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर 25 टक्के सैनिकांचे पुनर्मूल्यांकन केले जाईल
  3. त्यांना पुन्हा सैन्यात सामील होण्यासाठी विचार केला जाईल.
  4. या योजनेसाठी 17.5 वर्षे ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांची भरती करण्यात येणार असल्याची सूत्रांती माहिती आहे
  5. अर्जदारांच्या विद्यमान पात्रतेच्या आधारे आणि चाचणीद्वारे भरती केली जाईल.
  6. सहा महिन्यांच्या अंतराने शिपाई भरती वर्षातून दोनदा केली जाईल
  7. सहा महिन्यांचे प्रशिक्षण मिळेल, त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या कामांसाठी सैन्यात नियुक्त केले जाईल
  8. यामध्ये तज्ज्ञांच्या कामाचाही समावेश असेल.
  9. या नवीन योजनेअंतर्गत ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते
  10. पहिल्या टप्प्यात सुमारे 45 हजार तरुणांची भरती करण्यात येणार आहे.

संरक्षण मंत्री काय म्हणालेत जाणून घ्या

  1. या योजनेंतर्गत भरती झालेल्या तरुणांना सुरुवातीचे 30 हजार रुपये वेतन देण्याचा प्रस्ताव
  2. चौथ्या वर्षाच्या अखेरीस 40 हजार रुपये करण्यात येईल, 44 लाखांचा इन्शूरन्स देखील असल्याची सूत्रांची माहिती
  3. सेवा निधी योजनेंतर्गत या पगारातील 30 टक्के रक्कम बचत स्वरूपात ठेवण्याची योजना आहे
  4. सरकारही दर महिन्याला तेवढीच रक्कम देणार आहे
  5. चार वर्षे पूर्ण झाल्यावर या जवानांना 10 लाख रुपयांचे पॅकेज दिले जाईल
  6. या सैनिकांना पेन्शन मिळणार नाही. ज्या सैनिकांना आणखी १५ वर्षे ठेवले जातील त्यांनाच सेवानिवृत्तीचा लाभ मिळू शकेल.
  7. चार वर्षांच्या सेवेनंतर या सैनिकांना सामान्य जीवनात स्थायिक होण्यासाठी सरकारही मदत करेल
  8. त्यांना सेवेसाठी डिप्लोमा प्रमाणपत्र देखील दिले जाईल
  9.  जे पुढील नोकरी शोधण्यात मदत करेल. सेवेतील कौशल्याच्या आधारे हे प्रमाणपत्र दिले जाईल.

योजना बिपिन रावत यांनी तयार केली

या योजनेची ब्लू प्रिंट तत्कालीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी 2020 मध्ये तयार केली होती, असे सांगितलं जातंय. सैनिकांची कमतरता भरून काढणे, सैन्याच्या पेन्शनवरील खर्चात कपात करणे आणि तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रवृत्त करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

1.25 लाख सैनिकांची कमतरता

सध्या सैन्यात अधिकारी स्तरापेक्षा खाली सुमारे 1.25 लाख सैनिकांची कमतरता आहे. दर महिन्याला सुमारे पाच हजार सैनिक कमी होत आहेत. सैन्याची अधिकृत संख्या 1.2 दशलक्ष सैनिक आहे. कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वी लष्कर वर्षाला सुमारे 100 भरती रॅली काढत असे. दर सहा ते आठ जिल्ह्यांत हे मोर्चे काढण्यात आले. कोरोना सुरू होण्यापूर्वी 2019-20 मध्ये 80,572 सैनिकांची भरती करण्यात आली होती. तर 2018-19 मध्ये 53,431 सैनिक सामील झाले होते.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...