3 वेळा अपयशी ठरले, नंतर मेहनत घेतली… UPSC NDA त यश मिळालेल्या हरीशची सक्सेस स्टोरी

हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील हरीश वशिष्ठ यांनी कठोर परिश्रम आणि मेहनतीने यूपीएससी एनडीए परीक्षेत यश मिळवले आहे.

3 वेळा अपयशी ठरले, नंतर मेहनत घेतली… UPSC NDA त यश मिळालेल्या हरीशची सक्सेस स्टोरी
| Updated on: May 04, 2025 | 10:26 PM

हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील एक शेतकऱ्याच्या कुटुंबातील तरुणाने त्यांच्या जिद्दीवर स्वत:चे नव्हे तर आपल्या कुटुंबाचे देखील स्वप्न पूर्ण केले आहे.मुलाच्या आई-वडीलांचे स्वप्न होते की त्याने सैन्यात जावे आणि अधिकारी बनावे. त्याला देखील सैन्यात जायचे होते. त्यासाठी त्याने जीव तोडून अभ्यास केला आणि तीनदा अपशय येऊनही हार न मानता युपीएससीची एनडीएची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.

हरियाणा येथील भिवानी जिल्ह्यात राहणाऱ्या या तरुणाचे नाव हरीश वशिष्ठ आहे. हरिश एका सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. त्याने लहानपणापासुनच आर्मीत जाऊन देश सेवा करण्याचे स्वप्न पाहीले होते. त्याच्या कुटुंबाची देखील हिच इच्छा होती. त्याने युपीएससी एनडीएची परीक्षा दिली. ही परीक्षा त्याने चौथ्या प्रयत्नात क्लीअर केली. याआधी त्यांनी तीन वेळा परीक्षा दिली होती पण यशाने हुलकावणी दिली होती. ते परीक्षेत क्वाली फाय देखील होत होते. परंतू एसएसबी इंटरव्युवमध्ये फेल व्हायचे…

युवकांनी प्रेरणा घ्यावी असे यश

अशा परिस्थितीही त्यांनी हार मानली नाही आणि मेहनत करीत राहीले  आणि अखेर त्यांनी एनडीए परीक्षा पास केली. त्यांनी एनडीए १५३ कोर्समध्ये यश मिळविले आणि कुटुंबाचे आणि त्याचे स्वप्न पूर्ण केले. हरीश जेवढ्या वेळा असफल झाले तेवढ्या वेळ त्यांनी आणखी जास्त मेहनत घेत परीक्षा दिल्या.त्यामुळेच त्यांना यश मिळाले. दर वेळी ते आपल्या चुकांतून शिकत राहीले आणि यशाची चव अखेर चाखलीच…

हरीश याने मेहनत तर केलीच परंतू त्याच्या संपूर्ण कुटुंबाने देखील त्यांना पाठींबा दिला. शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला मुलाने हे यश मिळवले. अनेक जण एक दोनदा अपयश आल्यानंतर खचून जातात. आणि दुसरे करियर निवडतात परंतू हरीश यानी जिद्द सोडली नाही.