AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

APAAR ID: ‘एक देश, एक स्टूडेंट आयडी’, देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे कार्ड, 12 अंकी ओळखपत्रामुळे मिळणार अनेक फायदे

apaar card: अपार आयडी शैक्षणिक रिकॉर्ड ठेवण्याचे एक माध्यम आहे. अपारने मॅप केलेल्या सुविधांमुळे प्रवेश, स्कॉलरशिप, सवलती, क्रेडिट संचय, एक संस्थेतून दुसऱ्या संस्थेत क्रेडिट ट्रान्सफर, इंटर्नशिप, सर्टिफिकेट, नौकरीसाठी आवेदन आणि शैक्षणिक रिकॉर्डचे व्हेरिफिकेशन करता येते.

APAAR ID: 'एक देश, एक स्टूडेंट आयडी', देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे कार्ड, 12 अंकी ओळखपत्रामुळे मिळणार अनेक फायदे
APAAR CARD
| Updated on: Dec 05, 2024 | 1:44 PM
Share

भारताच्या शिक्षण प्रणालीत बदल करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. सरकार ‘एक देश, एक स्टूडेंट आयडी’ प्रकल्प राबवणार आहे. ऑटोमेटेड परमानेंट अ‍ॅकेडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच अपार (APAAR ID) प्रकल्प सरकार सुरु करणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना एक ओळखपत्र दिले जाणार आहे. आधारप्रमाणे 12 अंकी मिळणाऱ्या या ओळखपत्रामुळे विद्यार्थ्यांना अनेक फायदे मिळणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. शैक्षणिक प्रक्रिया सुलभ करणे, विद्यार्थी डेटाचे उत्तम व्यवस्थापन करणे आणि विद्यार्थ्यांना अधिक कार्यक्षम करणे, वैयक्तीक आणि पारदर्शक शिक्षणाचा अनुभव विद्यार्थ्यांना प्रदान करणे हे उद्दिष्ट आहे.

काय आहे अपार आयडी?

अपारचा अर्थ ऑटोमेटेड परमानेंट अ‍ॅकेडमिक अकाउंट रजिस्ट्री आहे. देशभरातील विद्यार्थ्यांना यामुळे ओळखपत्र मिळणार आहे. यामध्ये 12 अंकांचा कोड असणार आहे. विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक क्रेडीट डिजिटल माध्यमातून स्टोअर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे खाते मॅनेज आणि एक्सेस करण्यास मदत मिळणार आहे. त्यामध्ये स्कोअर कार्ड, मार्कशीट, ग्रेडशीट, डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेटचा समावेश असणार आहे.

अपार आयडी कसे मिळवणार

विद्यार्थ्यांनी अपार आयडी मिळवण्यासाठी apaar.education.gov.in या वेबसाईटवर जावे. त्यानंतर खाली दिलेल्या स्टेप फॉलो कराव्यात.

  • पडताळणी: तपशीलांची पडताळणी करण्यासाठी शाळेला भेट द्या
  • पालकांची संमती: विद्यार्थी अल्पवयीन असल्यास पालकांची संमती मिळवा.
  • प्रमाणीकरण: शाळेद्वारे ओळख सत्यापित करा.
  • यशस्वी पडताळणीनंतर, सुरक्षित ऑनलाइन प्रवेशासाठी APAAR आयडी तयार केला जातो आणि DigiLocker शी लिंक केला जातो.

अपार आयडीसाठी काय हवे?

युनिक स्टुडंट आयडेंटिफायर (PEN), विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, आईचे नाव, वडिलांचे नाव, आधारनुसार नाव, आधार क्रमांक.

अपारचे फायदे काय?

अपार आयडी शैक्षणिक रिकॉर्ड ठेवण्याचे एक माध्यम आहे. अपारने मॅप केलेल्या सुविधांमुळे प्रवेश, स्कॉलरशिप, सवलती, क्रेडिट संचय, एक संस्थेतून दुसऱ्या संस्थेत क्रेडिट ट्रान्सफर, इंटर्नशिप, सर्टिफिकेट, नौकरीसाठी आवेदन आणि शैक्षणिक रिकॉर्डचे व्हेरिफिकेशन करता येते.

रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.