HSC SSC Exam : कोरोना वाढतोय, दहावी बारावीच्या परीक्षांचं काय होणार?, बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलं उत्तर

राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळं मार्च एप्रिल महिन्यात होणाऱ्या दहावी बारावी (SSC HSC Exam) परीक्षा नेमक्या कशा होणार यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.

HSC SSC Exam : कोरोना वाढतोय, दहावी बारावीच्या परीक्षांचं काय होणार?, बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलं उत्तर
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 10:58 AM

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना संसर्ग (Maharashtra Corona Update) वाढू लागला असून ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील वाढली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल 18 हजार 466 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात काल 20 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 653 वर पोहोचली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळं मार्च एप्रिल महिन्यात होणाऱ्या दहावी बारावी (SSC HSC Exam) परीक्षा नेमक्या कशा होणार यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सद्यस्थितीत दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचं निश्चित असून वेगळा निर्णय घेण्यात आलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच

महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह इतर शहरांमध्ये कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. यामुळं मुंबई सह अनेक शहरातील ऑफलाईन शाळा बंद करण्यात आल्या असून पुन्हा एकदा ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आलं आहे. सद्यस्थितीत दहावी आणि बारावीचे वर्ग ऑफलाईन पद्धतीनं सुरु आहेत.

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण पूर्ण करण्याचं टार्गेट

केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणं 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील 3 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झालीय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचं टार्गेट असल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना करणार असून आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाच्या संपर्कात आहे.

विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यास विशेष व्यवस्था

दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु असताना एखाद्या विद्यार्थ्याच्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा त्याला कोरोना संसर्ग झाल्यास त्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी परीक्षा घेण्याचं नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आहे.

इतर बातम्या:

Uday Samant : विद्यापीठ, कॉलेज पुन्हा ऑनलाईन? उदय सामंत निर्णय जाहीर करणार

BMC : दहावीचं वर्ष संपताना टॅब खरेदीचा प्रस्ताव, मुंबई महापालिकेचा 39 कोटींचा खर्च नेमका कुणाच्या फायद्याचा?

HSC SSC Exam Maharashtra update Corona cases increased in state MSBHSE president shard Gosavi said no change in HSC SSC Exam

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.