
ICSE 10th Exam 2025: कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (ICSE) ICSE बोर्डाची दहावीची परीक्षा 18 फेब्रुवारी 2025 पासून म्हणजेच आजपासून घेणार आहे. या परीक्षेचा समारोप 27 मार्च रोजी होणार आहे. परीक्षेची सुरुवात इंग्रजी भाषेने होईल. सकाळी 11 वाजता सुरू होणारी ही परीक्षा दोन तास चालणार आहे. यावर्षी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी अगोदरच लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही.
उमेदवारांना परीक्षेच्या नियोजित वेळेच्या 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागेल, कारण त्यानंतर गेट बंद केले जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत गेट उघडले जाणार नाही. पेपर संपण्यापूर्वी परीक्षा हॉलमधून बाहेर पडू दिले जाणार नाही, असा इशाराही बोर्डाने विद्यार्थ्यांना दिला आहे.
विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. या परीक्षेचा निकाल मे 2025 मध्ये जाहीर करण्यात येईल, असे बोर्डाने म्हटले आहे.
उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये कोणतीही पुस्तके, पॉकेट बुक, नोट्स, पेपर, कॅल्क्युलेटर, मोबाइल फोन किंवा वायरलेस डिव्हाइस ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे असे कोणतेही शस्त्र नसावे, जे परीक्षेच्या वेळी शस्त्र म्हणून वापरता येईल. जर कोणी असे करताना आढळले तर त्याची परीक्षा रद्द केली जाईल आणि त्याच्यावर परीक्षेवर बंदी देखील घातली जाऊ शकते.