IIT Madras: IIT मद्रास अव्वल! “शिक्षण मंत्रालय भारत रँकिंग 2022” ची उच्च शिक्षण संस्थांची यादी जाहीर

IIT Madras Tops The List: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स-बेंगळुरू आणि आयआयटी-बॉम्बे या संस्थांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. आयआयएससी बेंगळुरूला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ

IIT Madras: IIT मद्रास अव्वल! शिक्षण मंत्रालय भारत रँकिंग 2022 ची उच्च शिक्षण संस्थांची यादी जाहीर
IIT MadrasImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 3:20 PM

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या (Union Ministry Of Education) उच्च शिक्षण संस्थांच्या (Higher Educational Institutions) भारत रँकिंग 2022 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-मद्रासने (IIT Madras) अव्वल स्थान पटकावले आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या यादीत दिली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स-बेंगळुरू आणि आयआयटी-बॉम्बे या संस्थांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. आयआयएससी बेंगळुरूला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ, तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया यांना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला आहे.

IIT मद्रास हे उत्तम इंजिनीअरिंग कॉलेज

आयआयटी मद्रास हे उत्तम इंजिनीअरिंग कॉलेज असून त्यानंतर आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मुंबईचा क्रमांक लागतो. आयआयएम-अहमदाबाद ही भारतातील सर्वोत्तम बिझनेस स्कूल म्हणून ओळखली जाते, त्यानंतर आयआयएम-बंगळुरू आणि आयआयएम-कलकत्ता यांचा क्रमांक लागतो. फार्मसी संस्थांमध्ये जामिया हमदर्दने अव्वल क्रमांक पटकावला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, हैदराबाद हे श्रेणीत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर पंजाब युनिव्हर्सिटी, चंदीगड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हे सुद्धा वाचा

“शिक्षण मंत्रालय भारत रँकिंग 2022” ची यादी जाहीर

मिरांडा हाऊस सर्वोत्तम महाविद्यालय

मिरांडा हाऊस हे या क्रमवारीनुसार सर्वोत्तम महाविद्यालय आहे, तर हिंदू महाविद्यालय दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर प्रेसिडेन्सी महाविद्यालयाचा क्रमांक लागतो. एम्स, नवी दिल्ली, हे जाहीर केलेल्या यादीनुसार सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालय आहे. चेन्नईतील सविठा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेस हे या यादीनुसार उत्तम दंत महाविद्यालय आहे. आयआयएम अहमदाबाद ही देशातील सर्वोत्तम व्यवस्थापन संस्था असून त्यानंतर आयआयएम बेंगळुरू आणि आयआयएम कलकत्ता यांचा क्रमांक लागतो.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.