JNVST Exam Date: जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तारीख ठरली, 11 ऑगस्टला सर्व राज्यात परीक्षा

जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीसाठी प्रवेश परीक्षा 11 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली.

JNVST Exam Date: जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तारीख ठरली, 11 ऑगस्टला सर्व राज्यात परीक्षा
प्रातिनिधिक फोटो

JNVST Exam Date नवी दिल्ली: जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीसाठी प्रवेश परीक्षा 11 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. “सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या सत्र 2021-22 च्या सहावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी नवोदय विद्यालय निवड चाचणी -2021 चं आयोजन 11 ऑगस्ट 2021 रोजी केलं जाईल. कोरोनासंबंधी सर्व खबरदारी आणि कोविड प्रोटोकॉलचं पालन करुन परीक्षा आयोजित केली जाईल.

देशभरातील नवोदय विद्यालयात 6 वीच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावरील प्रवेश परीक्षा म्हणून जेएनव्हीएसटी प्रवेश परीक्षा घेतली जाते. जेएनव्ही वर्ग 6 प्रवेश परीक्षा प्रत्येक राज्यातील इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येते. प्रवेश परीक्षा दोन तासांच्या कालावधीसाठी घेतली जाते आणि त्यात तीन विभाग असतात. ज्यात एकूण 80 वस्तुनिष्ठ प्रश्न असतात आणि त्यात एकूण 100 गुण असतात. मानसिक क्षमता, अंकगणित चाचणी आणि भाषा चाचणी हे तीन विभाग आहेत.

जेएनव्हीएसटी इयत्ता 6 वीची परीक्षा दिल्यानंतर गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नवोदय विद्यालय समितीकडून कागदपत्रं पडताळणी करावी लागेल. केवळ कागदपत्रं पडताळणीनंतर,गुणवत्ता यादीतील उमेदवार जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवू शकतात.

अकरावी प्रवेशासाठी सीईटी नोंदणीस प्रारंभ

महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे, आता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी आजपासून सुरू झाली आहे. नोंदणीसंदर्भात सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सीईटी परीक्षेची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 21 ऑगस्ट रोजी परीक्षा होणार आहे. महाराष्ट्रात दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे.

सीईटीची प्रक्रिया कशी असेल?

सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेतली जाईल. इंग्रजी, गणित (भाग 1 व 2), विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग 1 व 2) सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या प्रत्येक घटकावर प्रत्येकी 25 गुणांचे एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत. कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी विषयनिहाय 25 टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला असून या अभ्यासक्रमावर सीईटीमध्ये प्रश्न विचारले जातील. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी सीईटीसाठी परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, सीबीएसईसह इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी 178 रुपये शुल्क भरावे लागेल. उमेदवार अधिकृत वेबसाइट- cet.mh-ssc.ac.in आणि mahahsscboard.in येथे जाऊन सीईटी नोंदणी करू शकतात.

इतर बातम्या:

चंद्रपूरच्या मनपा शाळांची बातच न्यारी, कॉन्वेंटच्या विद्यार्थ्यांचीही मनपा शाळांना पसंती, पालिकेच्या शाळा हाऊसफुल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI