JEE Advanced 2021 : जेईई ॲडव्हान्सड परीक्षेतील फिजिक्स केमिस्ट्री, मॅथ्सची प्रश्नपत्रिका जाहीर, निकाल कधी लागणार?

जेईई अ‌ॅडव्हान्सड 2021 भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयाची प्रश्न पत्रिका आज जारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या उत्तरांची प्रत उद्या 5 ऑक्टोबर 2021 पासून उपलब्ध होईल.

JEE Advanced 2021 : जेईई ॲडव्हान्सड परीक्षेतील फिजिक्स केमिस्ट्री, मॅथ्सची प्रश्नपत्रिका जाहीर,  निकाल कधी लागणार?
विद्यार्थी
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 7:04 PM

JEE Advanced 2021 नवी दिल्ली: संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा रविवारी घेण्यात आली आहे. ही परीक्षा भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IITs) अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर आणि नियोजन कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली गेली. जेईई अ‌ॅडव्हान्सड 2021 भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयाची प्रश्न पत्रिका आज जारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या उत्तरांची प्रत उद्या 5 ऑक्टोबर 2021 पासून उपलब्ध होईल. जे विद्यार्थी परीक्षेला बसले होते ते अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in त्यांनी नोंदवलेली उत्तर पाहू शकतात. जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुपारी 2:30 ते 5:30 या वेळेत दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. प्राथमिक उत्तर तालिका 10 ऑक्टोबर रोजी जारी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत आक्षेप सादर करण्याची संधी असेल.

अंतिम निकाल 15 ऑक्टोबरला

जेईई अॅडव्हान्स्ड 2021 परीक्षेची अंतिम उत्तर तालिका आणि निकाल 15 ऑक्टोबर 2021 रोजी जाहीर केला जाईल. जेईई मेन 2021 परीक्षा उत्तीर्ण करणारे 2.5 लाख विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड 2021 परीक्षेसाठी पात्र असतात. देशातील आयआयटी संस्थातील प्रवेशासाठी ही परीक्षा आयोजित केली जाते. परीक्षेपासून निकालापर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

परीक्षेचा तपशील

जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा या वर्षी आयआयटी खरगपूरतर्फे 630 परीक्षा केंद्रावर घेतली गेली आहे. गेल्या वर्षी, जेईई मेन उत्तीर्ण झालेल्या 2,50,621 उमेदवारांपैकी 1,60,838 ने जेईई प्रगत साठी नोंदणी केली होती. यातील 1,50,838 विद्यार्थ्यांपैकी 43,204 उमेदवार दोन्ही पेपरसाठी पात्र ठरले होते.

जेईई ॲडव्हान्सड नेमकी काय?

जॉइंट एंट्रन्स एक्झाम मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालेले अडीच लाख विद्यार्थी जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करतात. जेईई ॲडव्हान्स्ड 2 पेपर्स मध्ये घेतली जाते. पहिला पेपर सकाळी 9 ते 12 तर दुसरा पेपर 2.30 ते 5.30 या वेळेत घेतला गेला

जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्सड परीक्षेनंतर कुठे प्रवेश मिळतो?

जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्सडपरीक्षे नंतर देशातील आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश घेता येतो. यामध्ये बॅचलर्स, इंटिग्रेटेड, मास्टर्स डिग्री कोर्स अशा अभ्यासक्रमांना जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश मिळतो. आयआयटी खरगपूर, आयआयटी कानपूर, आयआयटी दिल्ली, आयआयटी मद्रास, आयआयटी बॉम्बे, या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

इतर बातम्या:

JEE Advanced 2021 : जेईई ॲडव्हान्सड परीक्षेची 630 परीक्षा केंद्रावर जय्यत तयारी, विद्यार्थ्यांसाठी नियमावली जाहीर

JEE Advanced 2021 exam pcm question paper released answer response display tomorrow on jeeadv ac in

Non Stop LIVE Update
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?.
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?.
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी....
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?.
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची.
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?.
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?.
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर.
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल.