AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IIT, NIT प्रवेशासाठी JoSAA काउन्सिलिंग सुरू! अर्ज करण्यापूर्वी ‘ही’ माहिती नक्की वाचा

जेईई अ‍ॅडव्हान्स 2025 चे JoSAA काउन्सिलिंग सुरु झाले, परंतू त्यासाठी अर्ज कसा करायचा, कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत, किती प्रवेश फी भरावी लागेल, महत्त्वाच्या तारखा कोणत्या, माहिती नाही? चला या लेखातून जाणून घेऊया.

IIT, NIT प्रवेशासाठी JoSAA काउन्सिलिंग सुरू! अर्ज करण्यापूर्वी ‘ही’ माहिती नक्की वाचा
JoSAA Counselling 2025 RegistrationImage Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us
| Updated on: Jun 09, 2025 | 5:19 PM

अभियांत्रिकी प्रवेश परिक्षा जेईई अ‍ॅडव्हान्स चा निकाल जाहिर झालेला आहे. IIT मध्ये प्रवेश प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. ही परिक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी पुढचे मोठे पाऊल म्हणजे JoSAA काउन्सिलिंग. जाईंट सिट अलोकेशन ऑथोरिटीने (JoSAA) 03 जून 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून काउन्सिलिंग प्रक्रियेला सुरुवात केली.

JoSAA काउन्सिलिंगद्वारे देशभरातील आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि इतर सरकारी अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश दिला जाईल. यावर्षी काउन्सिलिंग नोंदणी आणि कॉलेज/ कोर्स निवडण्याची शेवटची तारीख 12 जून 2025 आहे. अशावेळी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेवर अर्ज करणे आवश्यक आहे.

कोण अर्ज करु शकते?

जेईई अ‍ॅडव्हान्स 2025 मध्ये उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार JoSAA काउन्सिलिंगमध्ये सहभागी होऊ शकतात. याद्वारे ते आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि जीएफटीआय सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवू शकतात.

मॉक सीट अलॉटमेंट कधी होईल?

पहिली मॉक सीट अलॉटमेंट यादी 9 जून 2025 रोजी येईल. दुसरी मॉक लिस्ट 11 जून 2025 रोजी जाहिर होईल.

कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत?

• दहावी आणि बारावीचे सर्टिफिकेट आणि मार्कशीट • जेईई मेन किंवा अ‍ॅडव्हान्स हाॅल तिकिट • कॅटॅगरी किंवा पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र (लागू असल्यास) • मेडिकल सर्टिफिकेट • बँक डिटेल्स (रिफंडसाठी) • पासपोर्ट किंवा ओसीआय/पीआयओ कार्ड (लागू असल्यास)

किती प्रवेश फी भरावी लागेल?

एससी, एसटी आणि दिव्यांग कॅटॅगरीमधील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी 20,000 आहे.

जनरल, ओबीसी-एनसीएल आणि ईडब्ल्यूएस कॅटॅगरीमधील विद्यार्थ्यांसाठी हे फी 45,000 निश्चित करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या तारखा

• काउन्सिलिंग अर्ज करण्यासाठी सुरुवात: 3 जून 2025 (सायंकाळी 5 वाजल्यापासून)

• अंतिम तारीख: 12 जून 2025

मॉक अलॉटमेंट: 9 आणि 11 जून 2025

JoSAA काउन्सिलिंगसाठी अर्ज कसा करायचा?

1. प्रथम josaa.nic.in या वेबसाईटवर जा.

2. होमपेजवर दिलेल्या “JoSAA Counselling 2025 Registration” लिंकवर क्लिक करा.

3. तुमचा जेईई मेन किंवा जेईई अ‍ॅडव्हान्सचा रोल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

4. आता तुम्हाला हवे असलेले काॅलेज आणि कोर्स निवडा आणि प्राधान्यक्रमानुसार ते सेट करा.

5. सर्व माहिती भरल्यानंतर, फॉर्म सबमिट करा आणि त्याची एक प्रत डाउनलोड करुन तुमच्याकडे ठेवा.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.