JEE Main 2021: जेईई मेन परीक्षा चौथ्या सत्राची नोंदणी पुन्हा सुरु, वाचा सविस्तर

जेईईच्या चौथ्या सत्रासाठी नोंदणी करणारे विद्यार्थी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या jeemain.nta.nic.in वेबसाइटला भेट देऊन अर्ज दाखल करु शकतात. 11 ऑगस्टपर्यंत विद्यार्थी अर्ज करु शकतात.

JEE Main 2021: जेईई मेन परीक्षा चौथ्या सत्राची नोंदणी पुन्हा सुरु, वाचा सविस्तर
जेईई मेन्सच्या अंतिम सत्राची परीक्षा 26 ऑगस्टपासून सुरू होणार
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 6:11 PM

JEE Main 2021 नवी दिल्ली : जेईई मेन 2021 च्या चौथ्या सत्रासाठी नोंदणीची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. जे विद्यार्थी काही कारणामुळे नोंदणीपासून करु शकले नाहीत त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. जेईईच्या चौथ्या सत्रासाठी नोंदणी करणारे विद्यार्थी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या jeemain.nta.nic.in वेबसाइटला भेट देऊन अर्ज दाखल करु शकतात. 11 ऑगस्टपर्यंत विद्यार्थी अर्ज करु शकतात.

विद्यार्थ्यांना आणखी एक संधी

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं उमेदवारांना आणखी एक संधी देत, अर्ज सादर करण्याची विंडो (JEE Mains Application Window) पुन्हा उघडली आहे. एनटीएनं ही विद्यार्थ्यांना 11 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9 पर्यंत अर्ज सादर करण्यास सांगितलं आहे. 11 ऑगस्ट रोजी रात्री 11.50 पर्यंत विहित परीक्षा शुल्क भरू सादर करता येईल. जेईई मेन चौथ्या सत्राच्या परीक्षेची फी ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.

अर्ज आणि अर्जात सुधारणा कशी करायची

स्टेप 1 : विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर भेट द्यावी. स्टेप 2 : “जेईई मेन 2021 च्या सत्र 4 साठी नोंदणी/सुधारणा” लिंकवर क्लिक करा स्टेप 3 : लॉगिन करण्यासाठी आवश्यक माहिती सादर करा. स्टेप 4 : अर्जात चूक आढळल्यास दुरुस्त करा स्टेप 5 : सबमिटवर क्लिक करा आणि भविष्यातील संदर्भासाठी सबमिट केलेल्या फॉर्मची प्रिंट आउट घ्या.

परीक्षा कधी होणार

NTA ने जेईई मेन चौथ्या सत्राची परीक्षा 26, 27 आणि 31 ऑगस्ट आणि 1 आणि 2 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्याची घोषणा केली आहे. जेईई मेन नोंदणी 2021 आणि अर्ज सुधारणा विंडो 11 ऑगस्टला रात्री 9 वाजता बंद होणार आहे.

जेईई सत्र 3 चा निकाल

NTA ने 6 ऑगस्ट 2021 रोजी JEE Main 2021 सत्र 3 निकाल जारी केला होता. एकूण 17 विद्यार्थ्यांनी 100 टक्के परफेक्ट गुण मिळवले होते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी पुढील आठवड्यात जेईई मेन चौथ्या सत्रासाठी प्रवेशपत्र जारी करू शकते. परीक्षेत अनुक्रमे पेपर 1 अभियांत्रिकी आणि पेपर 2 आर्किटेक्चर/ प्लॅनिंग दोन्हीसाठी घेण्यात येईल. जेईई मेन 2021 सत्र 4 परीक्षेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला नियमित भेट द्या.

इतर बातम्या:

JEE Main 2021 Result declared : जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, jeemain.nta.nic.in वर पाहा तुमचा रिझल्ट

JEE Main 2021 Result Toppers | जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, 17 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण

JEE Main 2021 session 4 NTA restart application Process and Correction Window open know how to apply

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.