AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Junior College Admission : बारावीला कॉलेज बदलताना ‘हा’ नियम पाळावा लागणार !

दहावी नंतर कुठल्याही कॉलेजला प्रवेश घेताना तो प्रवेश दहावीच्या मार्कांवर अवलंबून असायचा त्यामुळे विद्यार्थ्यांना बरेचदा हवं ते कॉलेज मिळत नसायचं. 11वी (11th) मिळालेल्या कॉलेजात काढायची आणि बारावीला हव्या असलेल्या कॉलेजात डोनेशन भरून प्रवेश घ्यायचा अशी पद्धत रीतसर सुरु असायची.

Junior College Admission : बारावीला कॉलेज बदलताना 'हा' नियम पाळावा लागणार !
बारावीला कॉलेज बदलताना 'हा' नियम पाळावा लागणार !Image Credit source: TV9 marathi
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 17, 2022 | 12:04 PM
Share

मुंबई: बारावीला आता आपल्या पसंतीचं कॉलेज घ्यायचं असेल तर त्यासाठी आता शिक्षण उपसंचालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळं बारावीला हवं ते कॉलेज (Junior College) आता विद्यार्थ्यांना थोडं अडचणीचं ठरणार आहे. दहावी नंतर कुठल्याही कॉलेजला प्रवेश घेताना तो प्रवेश दहावीच्या मार्कांवर अवलंबून असायचा त्यामुळे विद्यार्थ्यांना बरेचदा हवं ते कॉलेज मिळत नसायचं. 11वी मिळालेल्या कॉलेजात काढायची आणि बारावीला हव्या असलेल्या कॉलेजात डोनेशन (Donation) भरून प्रवेश घ्यायचा अशी पद्धत रीतसर सुरु असायची. या सगळ्याला आळा घालण्यासाठी आता बारावीत कॉलेज बदलून घेण्यासाठी शिक्षण उपसंचालकांची परवानगी घेण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. याशिवाय आता बारावीला (12th) कॉलेज बदलताना कारण सुद्धा रास्त लागणार आहे. ठराविक कारणांसाठीच कॉलेज बदलायची मुभा आता मिळणार आहे.

ना हरकत प्रमाणपत्र

विद्यार्थ्यांना अडचण असल्यास जे कॉलेज हवं असेल त्या कॉलेजकडून ना हरकत प्रमाणपत्र तसंच कॉलेज बदलासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाची मान्यता आणि नेमकं कारण (रास्त कारण) असेल तरच विद्यार्थ्याला कॉलेज बदलायची परवानगी मिळणार आहे. बारावी प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयाला पाठवणं आवश्यक आहे.

कारणं पडताळून घेऊनच विद्यार्थ्यांना प्रवेश

सध्या विद्यार्थी शिक्षण घेत असलेलं कॉलेज घरापासून लांब असणं, पालकांची बदली होणे, वैद्यकीय कारणास्तव परिसरातलं कॉलेज मिळणे, शाखा बदलून मिळणे, विद्यर्थ्यांचा राहण्याचा पत्ता बदलणे, बारावीमध्ये विद्यार्थ्याला बोर्ड बदलून घ्यायचा असेल तर अशा कारणांसाठी पूर्वी बारावीमध्ये कॉलेज बदलून मिळत असे. पण बारावीला कॉलेज बदलून घेण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे त्यामुळे आता ही कारणं पडताळून घेऊनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?