Maharashtra Board 12th Result 2024 : जोरदार… जबरदस्त… 12 वीचा निकाल जाहीर, एवढ्या विषयात विद्यार्थ्यांना मिळाले पैकीच्या पैकी गुण

Maharashtra Board 12th Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल अखेर आज जाहीर करण्यात आला. एकूण 93.37% लागला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.51 टक्के लागला.

Maharashtra Board 12th Result 2024 : जोरदार... जबरदस्त... 12 वीचा निकाल जाहीर, एवढ्या विषयात विद्यार्थ्यांना मिळाले पैकीच्या पैकी गुण
| Updated on: May 21, 2024 | 1:15 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल अखेर आज जाहीर करण्यात आला. एकूण 93.37% लागला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.51 टक्के लागला तर मुंबईचा निकाल सर्वात कमी 91.95 टक्के इतका लागला. या परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर आज दुपारी 1 वाजता जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना आता चेक करता येईल. एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली.

यावर्षीही 12 वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली. मुलींचा निकाल 95.44 टक्के आहे तर मुलांचा निकाल 91.60 इतका लागला. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.84 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीच्या निकालाचा टक्का वाढला आहे. 2.12 टक्के जास्त निकाल लागला आहे. 97.51 टक्के असा कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागलाय तर मुंबईचा निकाल सर्वात कमी म्हणजे 91.95 टक्के लागला.
विशेश बाब म्हणजे 12 वीच्या परीक्षेतील 154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल हा चक्क 100 % इतका लागला आहे.

12 वीच्या निकालाची वैशिष्ट्यं :

राज्याचा निकाल 93.37 %

सर्वात जास्त निकाल कोकण विभाग 97.51 %

सर्वात कमी निकाल मुबई विभाग 91.95 %

मुलींचा निकाल ९५.४४ टक्के 95.44 %

मुलांचा निकाल 91.60 %

मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.84 टक्क्यांनी जास्त आहे

154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल 100 % लागला.

विज्ञान विभाग निकाल 97.82 %

कला शाखा निकाल 85.88 %

वाणिज्य विभाग निकाल 92.18 %

व्यवसाय अभ्यासक्रम 87.25 %

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल 2.12 % ने जास्त लागला आहे.

Maharashtra HSC RESULT