Maharashtra School Reopen : मुंबई पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपासून करण्याचा निर्णय परिस्थिती पाहूनच घेऊ : वर्षा गायकवाड

मुंबई पुण्यातील परिस्थिती पाहूनचं शाळेचा निर्णय घेतला जाईल. ओमिक्रॉनच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

Maharashtra School Reopen : मुंबई पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपासून करण्याचा निर्णय परिस्थिती पाहूनच घेऊ : वर्षा गायकवाड
वर्षा गायकवाड उद्धव ठाकरे

मुंबई: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मुंबई पुण्यातील (Mumbai Pune ) परिस्थिती पाहूनचं 15 डिसेंबरपासून शाळेचा निर्णय घेतला जाईल असं म्हटलं. ओमिक्रॉनच्या (Omicron) परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. राज्य सरकारनं 1 डिसेंबरपासून शाळा सुरु केल्यानंतर मुंबई पुण्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला होता. आता ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याबाबत काय निर्णय होणार हे येत्या काही दिवसांमध्ये समोर येईल.

मुंबई पुण्यातील परिस्थिती पाहून निर्णय

वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु करण्यासाठी आम्ही नियमावली टास्क फोर्सशी चर्चा करुन बनवली असल्याचं म्हटलं. आम्ही शाळांसाठी अनेक बारीक गोष्टींचा विचार करुन नियमावली बनवली आहे. मुंबई पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय़ घेतला जाईल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

15 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याबाबत आढाव घेऊन निर्णय

राज्यातील ग्रामीण भागात 1 डिसेंबरपासून शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र, पुणे आणि मुंबईतल्या शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता. आता मुंबई आणि पुणे, कल्याण डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळं शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय परिस्थितीचा आढावा घेऊन घेण्यात येईल.

ओमिक्रॉनचे राज्यात दहा रुग्ण

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन वेरिएंटनं राज्यात प्रवेश केला आहे. कल्याण डोंबिवलीत 1, पिंपरीमध्ये 6, पुण्यात 1 आणि मुंबईत 2 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ओमिक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि शालेय शिक्षण विभाग काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.
मुंबई विभागातील शाळा 15 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. अद्याप त्या निर्णयात बदल झाला नसल्याचं मुंबई महापालिकेचे अधिकारी राजू तडवी यांनी सांगितलं आहे. मुंबई, पुणे आणि डोंबिवलीतील वाढत्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य यांचा विचार करुन निर्णय घेऊ, असं तडवी म्हणाले.

इतर बातम्या

Ashish Shelar: मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पात घोटाळा; मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर शेलारांचा गंभीर आरोप

Worli Gas Cylinder Blast : उत्तर प्रदेशातील घटनेवेळी कुठे गेली होती संवेदना? पेडणेकरांचा शेलारांना टोला

Maharashtra Education Minister Varsha Gaikwad said school reopen in mumbai pune start after review of corona and omicron conditions and discussions with CM and Task Force

Published On - 1:42 pm, Tue, 7 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI