राज्य सरकारचा मोठा निर्णय, साताऱ्यात समूह विद्यापीठाची स्थापना होणार

सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने समूह विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. (group university karmaveer bhaurao patil)

राज्य सरकारचा मोठा निर्णय, साताऱ्यात समूह विद्यापीठाची स्थापना होणार
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 10:31 PM

मुंबई : राज्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने समूह विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय आज घेतला. आज (5 मे) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. (Maharashtra government taken decision to establish group University at Satara in name of Karmaveer Bhaurao Patil)

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने समूह विद्यापीठ निर्माण करणे शक्य व्हावे यासाठी राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियाना अंतर्गत जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार ज्या महाविद्यालयांकडे पुरेशा शैक्षणिक, भौतिक तसेच तांत्रिक, पायाभूत सोयीसुविधा आहेत; अशा 3 ते 5 विद्यमान महाविद्यालयांची संसाधने एकत्रित करुन केली जाणार आहेत. त्यानंतर समूह विद्यापीठाची स्थापना केली जाईल. समूह विद्यापीठाच्या गुणवत्तेचा दर्जा राखण्यात समर्थ असलेल्या महाविद्यालयांचा समावेश यामध्ये करण्यात येईल.

याच नियामानुसार आज (2 मे) राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत यशवंतराव चव्हाण विज्ञान संस्था, सातारा (स्वायत्त) हे मुख्य महाविद्यालय, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा (स्वायत्त) आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा (स्वायत्त) या महाविद्यालयांचा समावेश असलेले “कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा” हे समूह विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.

खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयातील प्राध्यापकांना 7 वा वेतन आयोग

राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शासन अनुदानित खासगी आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयातील 622 प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापकांना 7 व्या वेतन आयोगाच्या तरतुदी लागू करण्यास आज मान्यता देण्यात आली. यासाठी 116 कोटी 77 लाख 11 हजार इतका खर्च मंजूर करण्यात आला. तसेच तसेच 1 जानेवारी 2016 पासून वेतन थकबाकीदेखील देण्यास आज मान्यता देण्यात आली.

इतर बातम्या :

Maharashtra Coronavirus LIVE Update : उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात 783 नवे रुग्ण, सात जणांचा मृत्यू

Steroids मुळे कोरोना रुग्णांना गंभीर आजाराची भीती, डॉ. रणदीप गुलेरियांचा इशारा

नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी! सोशल सिक्युरिटी कोडचा फायदा घेण्यास आधार आवश्यक, जाणून घ्या…

(Maharashtra government taken decision to establish group University at Satara in name of Karmaveer Bhaurao Patil)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.