HSC Result 2021 Maharashtra Pass Percentage : बारावीचा निकाल 99.63 टक्के, निकालासाठी इथे क्लिक करा

HSC Result 2021 Maharashtra Pass Percentage: राज्याचा 12 वी निकाल 99.63 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे.

HSC Result 2021 Maharashtra Pass Percentage : बारावीचा निकाल 99.63 टक्के, निकालासाठी इथे क्लिक करा
सांकेतिक फोटो

HSC Result declared : महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता (Maharashtra HSC Result 2021) होती. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. यानुसार राज्याचा 12 वी निकाल 99.63 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थी त्यांचा निकाल https://hscresult.11 thadmission.org.in, https://msbshse.co.in , hscresult.mkcl.org आणि mahresult.nic.in. या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.

यंदा राज्यात 12 विद्यार्थ्यांना 35 टक्के तर 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तसेच 91, 435 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्याहून अधिक गुण मिळविले आहेत. तसेच 1372 विद्यार्थ्यांनी 95 टक्क्याहून अधिक गुण मिळविले आहेत. 66871 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 66867 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 94.31 टक्के लागला आहे.

यंदाच्या निकालातही मुलींचीच बाजी!

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 99.81 टक्के लागला आहे तर मुलांचा निकाल 99.54 टक्के लागला आहे.

कोणत्या शाखेचा निकाल किती?

विज्ञान – 99.45 टक्के,

कला – 99.83 टक्के,

वाणिज्य 99.81 टक्के,

एमसीव्हीसी – 98.8 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.

किती विद्यार्थ्यांना किती गुण?

12 विद्यार्थ्यांना- 35 टक्के

91, 435 विद्यार्थ्यांना- 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण

1372 विद्यार्थ्यांना- 95 टक्के किंवा त्याहून अधिक गुण

46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.

विभागवार निकालाची टक्केवारी

१) कोकण : ९९.८१
२) मुंबई : ९९.७९
३) पुणे : ९९.७५
४) कोल्हापूर : ९९.६७
५) लातूर : ९९.६५
६) नागपूर : ९९.६२
७) नाशिक : ९९.६१
८) अमरावती : ९९.३७
९) औरंगाबाद : ९९.३४

कुणाचा निकाल किती?

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.81 टक्के लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वांत कमी म्हणजे 99.34 टक्के लागलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल 8.97 टक्क्यांनी वाढला आहे.

विज्ञान मागील वर्षी 96.93 टक्के, यावर्षी 99.45 टक्के, 2.52 टक्क्यांनी जास्त
कला शाखेचा मागच्या वर्षीचा निकाल 82.63 टक्के होता, यंदा हा निकाल 99.45 टक्के, 17.20 टक्क्यांनी जास्त
वाणिज्य शाखेचा मागच्या वर्षीचा निकाल 91.27 टक्के होता, यावर्षी 99.91 टक्के निकाल लागला. हा निकाल 8.64 टक्क्यांनी जास्त आहे.
एमसीव्हीसीचा मागील वर्षाचा निकाल 86.07 टक्के होता, यावर्षी 98.80 टक्के आहे, हा निकाल 12.73 टक्क्यांनी जास्त आहे.

बारावी निकालाचा बैठक क्रमांक कसा मिळवायचा?

स्टेप 1: http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवरील सर्च सीट नंबरवर जावा
स्टेप 2: यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा
स्टेप 3: त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आडनाव, तुमचं नाव, वडिलांचं नाव याप्रमाणं नमूद करावा
स्टेप 4: यानंतर सबमिट करा तुम्हाला तुमचा सीट नंबर मिळेल..

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI