AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC Exam : दहावीच्या परीक्षांना 15 मार्चपासून सुरुवात, बोर्डाची जय्यत तयारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBHSE) यावर्षी दहावीच्या (SSC Exam) परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षांना 15 मार्चपासून सुरुवात होत आहे.

SSC Exam : दहावीच्या परीक्षांना 15 मार्चपासून सुरुवात, बोर्डाची जय्यत तयारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: File Photo
| Edited By: | Updated on: Mar 13, 2022 | 3:30 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBHSE) यावर्षी दहावीच्या (SSC Exam) परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षांना 15 मार्चपासून सुरुवात होत आहे. कोरोना (Corona) प्रतिबंधक नियमांचं पालन करुन ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसंदर्भातील अधिक माहिती बोर्डाच्या वेबसाईटवर आणि त्यांच्या शाळांमध्ये उपलब्ध होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी च्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ही प्रवेशपत्र शाळेत संपर्क करुन किंवा वेबसाईटवरुन डाऊनलोड करता येतील. विद्यार्थ्यांकडे प्रवेशपत्र असल्याशिवाय त्यांना दहावीच्या परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळं त्यांनी परीक्षेला जाताना प्रवेशपत्र सोबत घेऊन जाणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी दहावीचे पेपर सुरु होण्यापूर्वी 30 मिनिटे परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे.

दोन सत्रात परीक्षा

बोर्डानं जारी केलेल्या वेळापत्रकाप्रमाणं ही परीक्षा दोन सत्रात आयोजित केली जाईल. पहिल्या शिफ्टमधील परीक्षा 10.30 ते दुपारी 2 पर्यंत होईल. तर, दुसऱ्या सत्रातील परीक्षा दुपारी 3 ते सायंकाळी 5.15 वाजता होईल. दहावीच्या परीक्षा घेताना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग लक्षात घेता परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षा आयोजित करण्यासाठी 5042 केंद्र निश्चित करण्यात येत होती. मात्र, यावेळी 21 हजार 341 केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. तर, बारावीसाठी 2943 परीक्षा केंद्रावर परीक्षेचं आयोजन करण्यात येत होतं. मात्र, यावेळी 9613 परीक्षा केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना मोबाईल फोन, टॅबलेट आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेटसचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

दहावीच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत घेण्यात येणार आहेत. प्रात्याक्षिक, तोडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत परीक्षा होईल. काही कारणामुळं प्तात्याक्षिक परीक्षा देता आली नाही तर 5 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत होतील. मंडळाच्या परीक्षा ठरलेल्या काळातचं होतील.

दहावी बारावीसाठी किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली? मंडळाकडे दहावीसाठी 16 लाख 25 हजार 311 अर्ज आले आहेत. यावर्षीच्या दहावीच्या परीक्षांचं स्वरुप हे वस्तूनिष्ठ, लघूत्तरी आणि दिर्घोत्तरी असं असेल. दहावीसाठी 7 विषय आणि 8 माध्यम असतात त्याच्या 158 प्रश्नपत्रिका असतात.

इतर बातम्या :

VIDEO | महाराष्ट्रात बदल्यांचा महाघोटाळा; रसद केंद्रीय गृहसचिवांना दिली, फडणवीसांचा धमाका!

मला आरोपी, सहआरोपी बनवलं जाईल असे सवाल केले, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा

गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.