मला आरोपी, सहआरोपी बनवलं जाईल असे सवाल केले, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा

मीच ऑफिशियल सिक्रेट अॅक्टचं उल्लंघन केलं आणि मीच त्याचा आरोपी आहे अशा प्रकारची ही प्रश्नावली होती. हा घोटाळा उघड करून तुम्ही ऑफिशियल सिक्रेसी घोटाळ्याचं उल्लंघन केलंय, असा सवाल मला केला गेला.

मला आरोपी, सहआरोपी बनवलं जाईल असे सवाल केले, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
मला आरोपी, सहआरोपी बनवलं जाईल असे सवाल केले, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 3:16 PM

मुंबई: मीच ऑफिशियल सिक्रेट अॅक्टचं उल्लंघन केलं आणि मीच त्याचा आरोपी आहे अशा प्रकारची ही प्रश्नावली होती. हा घोटाळा उघड करून तुम्ही ऑफिशियल सिक्रेसी घोटाळ्याचं उल्लंघन केलंय, असा सवाल मला केला गेला. मला आरोपी किंवा सहआरोपी बनवलं जाईल असे प्रश्न केले. मी त्याला उत्तर दिलं. माझ्यावर ऑफिशियल सिक्रसी अॅक्ट लागू होत नाही. माझ्यावर लागू झाला तर व्हिसल ब्लोअर अॅक्ट लागू झाला पाहिजे. मी घोटाळा बाहेर काढला मी व्हिसल ब्लोअर आहे असं मी तपास यंत्रणांना सांगितलं आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं. मुंबईच्या (mumbai) सायबर पोलिसांनी (cyber police) देवेंद्र फडणवीस यांचा दोन तास जबाब नोंदवला गेला. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन चौकशीबाबतची माहिती दिली. तसेच ठाकरे सरकारवरही टीकास्त्र सोडलं.

राज्यात बदल्यांचा महाघोटाळा झाला. या महाघोटाळ्याची सर्व माहिती मी केंद्रीय गृहसचिवांना दिली. त्यानंतर उच्च न्यायालयाने या घोटाळ्याची चौकशी सीबीआयला सोपवली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं. म्हणजे घोटाळा झाला हे सिद्ध होते. या घोटाळ्याची सरकारने चौकशी का केली नाही? सहा महिने अहवाल दाबून ठेवला. मी हा घोटाळा काढला नसता तर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा दबून गेला असता. मला पोलिसांनी प्रश्नावली दिली होती. मी उत्तर देणार असल्याचं सांगितलं. काल त्यांनी हजर राहण्याची नोटीस पाठवली. मी सभागृहात रोज विषय मांडत आहे. या सरकारच्या मंत्र्याचं दाऊद कनेक्शन, विरोधी पक्षासोबतचं षडयंत्रं याबाबत मी वारंवार बोलत आहे. त्यामुळे त्यांनी मला नोटीस पाठवली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी कालच सांगितलं मी जाणार आहे. मग सरकार आणि पोलिसांकडून विनंती केली आम्ही आपल्याकडे चौकशीसाठी येतो. आमचा स्टाफ पाठवतो. त्यानुसार ते आले, असंही त्यांनी सांगितलं.

त्यात गुणात्मक अंतर

दिली वळसे पाटील आज जे म्हणाले त्यात एक फरक आहे. वळसे पाटील यांनी जे सांगितलं, मला जे सवाल केले गेले आणि मला जे प्रश्न पाठवले होते त्यात गुणात्मक फरक आहे. आजच्या प्रश्नाचा रोख ऑफिशियल सिक्रसी अॅक्टचं मी उल्लंघन केलं असा होता. घोटाळा उघड करून तुम्ही ऑफिशियल सिक्रेसी अॅक्टचं उल्लंघन केलं असा सवाल मला केला. मला आरोपी, सह आरोपी बनवलं जाईल असे प्रश्न विचारण्यात आले. मी त्याला उत्तर दिलं. माझ्यावर लागू झाला तर व्हिसल ब्लोअर अॅक्ट लागू झाला पाहिजे. मी घोटाळा बाहेर काढला हा व्हिसल ब्लोअर आहे. मला ऑफिशियल सिक्रेसी अॅक्ट लागू होत नाही, असं अधिकाऱ्यांना सांगितल्याचं फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या:

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरुन पोलीस बाहेर पडले, तब्बल 2 तास जबाब नोंदवला

VIDEO: फडणवीसांना एक नव्हे सहावेळा नोटीसा, जबाब नोंदवणं यात काही गैर नाही: दिलीप वळसेपाटील

बाहेर पडला की पाऊस अन् टिव्ही लावला की राऊत, हसन मुश्रीफांची जोरदार फटकेबाजी

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.