दहावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन वस्तूनिष्ठपणे करा, नियमांचा भंग केल्यास शाळांवर कारवाई, बोर्डाचा इशारा

दहावीचा निकाल वस्तूनिष्ठपणे लावावा अशा सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. Maharashtra SSC Result

दहावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन वस्तूनिष्ठपणे करा, नियमांचा भंग केल्यास शाळांवर कारवाई, बोर्डाचा इशारा
दहावी बारावी बोर्ड
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 10:59 AM

पुणे: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत निकष जाहीर केले. त्यानंतर त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी दहावीच्या अंतर्गत लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रकल्प आणि नववीच्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याच सूत्र निश्चित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं शासन निर्णयाच्या अधीन राहून दहावीचा निकाल वस्तुनिष्ठचं असायला हवा, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत. प्रक्रियेचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra SSC Result MSBHSE board said schools declare result of ssc objective manner)

वस्तूनिष्ठपणे निकाल लावा

राज्य सरकारनं निश्चित केलेल्या निकषाप्रमाणे वस्तूनिष्ठपणे निकाल जाहीर करावा, अशा सूचना बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत. मूल्यमापन पद्धतीच्या नियमांचा भंग केल्यास शाळांवर कारवाई होणार आहे. मुल्यमापनात फेरफार झाल्यास शाळांची मान्यताच होणार रद्द किंवा शाळेचा सांकेतिक क्रमांक बोर्डाकडून काढून घेण्यात येणार आहे.

निकालासाठी समिती

दहावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासाठी शाळास्तरावर समिती स्थापन करावी लागणार आहे. या समितीमध्ये मुख्याध्यापकांसह शाळेतील शिक्षकांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांचा नववीचा निकाल ,दहावीच्या मूल्यमापनाची कागदपत्रे आणि उत्तरपत्रिका निकाल समितीच्या पडताळणीनंतर मुख्याध्यापकांच्या ताब्यात ठेवावे लागणार आहेत. शाळास्तरावर निकालाची तपासणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत होणार आहे.दहावीच्या मूल्यमापनासंदर्भात माध्यमिक बोर्डाकडून शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत.

दहावीचा निकाल कसा लावणार?

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लावताना 9 वी व10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट 2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे. i. विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील. ii. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील. iii. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या:

दहावीची परीक्षा, निकाल ते 11 वी प्रवेश आणि CET, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

FYJC Class 11th Admission Process Maharashtra | अकरावीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार, जाणून घ्या सर्व प्रक्रिया

मोठी बातमी : दहावीचा निकाल जूनमध्ये, नववी-दहावीच्या अभ्यासक्रमावरुन मूल्यांकन, 11 वी प्रवेशाची प्रक्रियाही ठरली

(Maharashtra SSC Result MSBHSE board said schools declare result of ssc objective manner)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.