FYJC Class 11th Admission Process Maharashtra | अकरावीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार, जाणून घ्या सर्व प्रक्रिया

त्यामुळे दहावीची परीक्षा कशी होणार, निकाल कसा लागणार, त्यासह अकरावीचे प्रवेश कसे होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. (FYJC Class 11th Admission Process Maharashtra)

FYJC Class 11th Admission Process Maharashtra | अकरावीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार, जाणून घ्या सर्व प्रक्रिया
आयटीआय प्रवेशाचे अंतिम वेळापत्रक जाहीर; 6 सप्टेंबरला पहिली गुणवत्ता यादी
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 2:13 PM

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाटेचा हाहाकार पाहायला मिळत आहे. त्यामुळे दहावीची परीक्षा कशी होणार, निकाल कसा लागणार, त्यासह अकरावीचे प्रवेश कसे होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अकरावी प्रवेशप्रक्रिया कशी होईल याची माहिती त्यांनी दिली. (Education Minister Varsha Gaikwad Comment FYJC Class 11th Admission Process Maharashtra)

महाराष्ट्र सरकारने दहावीची परीक्षा (SSC exam 2021) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीच घेतला आहे. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे मुलांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे. तर इयत्ता 11 वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षा आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा 100 गुणांची असेल. ती OMR पद्धतीने घेतली जाईल. त्यासाठी दोन तासांचा अवधी दिला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

?अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशी असेल??

➡️ अकरावीची प्रवेशासाठी CET परीक्षा  

?इयत्ता 11 वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षा

?प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न

?गुण – 100

?बहुपर्यायी प्रश्न

?परीक्षा OMR पद्धतीने

?परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी

➡️कॉलेजमध्ये प्रवेशाचे निकष काय?

?CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये  प्रवेश

?CET परीक्षा देणाऱ्यांना 11 वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य

?त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश

?CET  परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता 10 वीच्या पद्धतीनुसार

(Education Minister Varsha Gaikwad Comment FYJC Class 11th Admission Process Maharashtra)

वर्षा गायकवाड काय म्हणाल्या? 

विविध परीक्षा मंडळानी यावर्षीच्या इयत्ता दहावीच्या निकालासाठी शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतले आहे. त्यामुळे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहणाच्या दृष्टीने आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी आम्ही इयत्ता 11 प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET घेणार आहोत. ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. या 100 गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील. ही परीक्षा OMR पद्धतीने होईल. या परीक्षेसाठी दोन तासांचा अवधी दिला जाईल, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

इयत्ता 11 वी प्रवेश परीक्षा राबवताना ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील. त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

दहावीचा निकाल कसा लावणार?

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लावताना ९ वी व १० वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय ०८ ऑगस्ट२०२९ नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. शैक्षविक वर्ष २०२०-२१ साठी इ.१० वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे. i. विद्यार्थ्यांचे इ १०वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण ii. विद्यार्थ्यांचे इ१०वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण iii. विद्यार्थ्यांचा इ. ९वी चा अंतिम निकाल ५०गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

(Education Minister Varsha Gaikwad Comment FYJC Class 11th Admission Process Maharashtra)

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी : दहावीचा निकाल जूनमध्ये, नववी-दहावीच्या अभ्यासक्रमावरुन मूल्यांकन, 11 प्रवेशाची प्रक्रियाही ठरली

दहावीची परीक्षा, निकाल ते 11 वी प्रवेश आणि CET, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.