Schools: मराठी शाळांमध्ये आता “हॅपीनेस करिक्युलम”! विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी मोठा निर्णय

वर्षा गायकवाड यांनी सर्व मराठी इयत्ता पहिली ते आठवीच्या सरकारी आणि अनुदानित क्षेत्रात "हॅपीनेस करिक्युलम" सुरू करण्याची घोषणा केली.

Schools: मराठी शाळांमध्ये आता हॅपीनेस करिक्युलम! विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी मोठा निर्णय
मराठी शाळांमध्ये आता "हॅपीनेस करिक्युलम"!
Image Credit source: TV9
रचना भोंडवे

|

Jul 02, 2022 | 12:39 PM

मुंबई: वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी महाराष्ट्र शालेय शिक्षण मंत्री म्हणून पदत्याग केला, हे पद त्याग करताना शेवटचा विषय म्हणून त्यांनी गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे 2 निर्णय जाहीर केले. वर्षा गायकवाड यांनी सर्व मराठी इयत्ता पहिली ते आठवीच्या सरकारी आणि अनुदानित क्षेत्रात “हॅपीनेस करिक्युलम” (Happiness Curriculum) सुरू करण्याची घोषणा केली. दुसरे असे की, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, टीईटीमध्ये (TET) संरक्षण दलातील जवान आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांना पात्रता गुणांमध्ये 15 टक्के सवलत देण्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलंय. वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “हे दोन निर्णय माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत. हेच शेवटचे निर्णय घेऊन मी महाराष्ट्राची शालेय शिक्षणमंत्री म्हणून शेवटची स्वाक्षरी केली आहे.

  1. सर्व शासकीय व अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीसाठी यंदापासून “हॅपीनेस करिक्युलम” (आनंद अभ्यासक्रम) सुरू करण्यात येणार आहे.
  2. महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षेत संरक्षण कर्मचारी व शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी पात्रता गुणांमध्ये 15 टक्के सवलत. देशाचे रक्षण करणे ही देशाची सर्वात मोठी सेवा आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे.”

विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसराशी अधिक कनेक्ट होण्यास मदत

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने येत्या शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीचा हॅपीनेस अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमांतर्गत शारीरिक स्वास्थ्याबरोबरच विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्यही सुनिश्चित केले जाणार आहे, यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसराशी अधिक कनेक्ट होण्यास मदत होईल.

हे सुद्धा वाचा

शहीद जवानांच्या कुटुंबातील उमेदवारांना 15 टक्के सवलत

महाराष्ट्राच्या माजी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या दोन्ही घोषणा संबंधित क्षेत्रात राबविल्या जातील. शहीद जवानांच्या कुटुंबातील उमेदवारांना 15 टक्के सवलत देण्याचा निर्णय महाराष्ट्र टी.ई.टी. श्रीमती वर्षा म्हणाल्याप्रमाणे, संबंधित व्यक्तींच्या फायद्यासाठी आणि सैनिकांना श्रद्धांजली म्हणून पात्रतेची ओळख करून दिली जात आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें