AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MHT CET 2022 Registration | एमएचटी-सीईटी 2022 साठी नोंदणीला सुरुवात, mhtcet2022.mahacet org वेबसाईटवर भरा अर्ज

शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी 2021 प्रवेश परीक्षेसाठी अर्ज नोंदणी सुरु करण्यात आली आहे.

MHT CET 2022 Registration | एमएचटी-सीईटी 2022 साठी नोंदणीला सुरुवात, mhtcet2022.mahacet org वेबसाईटवर भरा अर्ज
महासीईटी
| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 1:25 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra) राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (Maha CET Cell) माध्यमातून विविध विद्याशाखांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी 2022 (MHT CET 2022) साठी अर्ज नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. अर्जाची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होईल. https://mhtcet2022.mahacet.org या वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी आपली नोंदणी करु शकतील. आजपासून नोंदणीला सुरुवात झाली असून 31 मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची संधी आहे. 31 मार्चनंतर विलंब शुल्कासहित अर्ज दाखल करता येणार आहेत. पात्र आणि इच्छूक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्यावर्षी कोरोना विषाणू ससंर्गामुळं एमएचटीसीईटी प्रक्रिया उशिरा सुरु झाली होती. यंदा मात्र वेळेवर परीक्षा आयोजित होईल, अशी शक्यता आहे.

अर्ज नोंदणीला आजपासून सुरुवात

अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी 10 फेब्रुवारी म्हणजेच आजपासून अर्जाची नोंदणी सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठीचा विलंब शुल्काशिवायचा शेवटाचा दिवस हा 10 फेब्रुवारी 2022 असेल. त्यानंतर 7 एप्रिलपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येईल. अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांना https://mhtcet2022.mahacet.org या लिंकला भेट द्यावी लागेल. राज्य सामाईक कक्षाच्यावतीनं यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अर्ज कसा कसा करावा ?

स्टेप 1 : MHT CET 2022 साठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम mhtcet2022.mahacet.org. या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

स्टेप 2 : त्यासाठी MHT CET 2022 registration येथे क्लिक करा

स्टेप 3 : त्यानंतर सर्व आवश्यक असलेली माहिती व्यवस्थित भरा आणि सेव्ह वर क्लिक करा.

स्टेप 4 : MHT CET 2022 application form भरण्यासाठी अ‌ॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाका.

स्टेप 5 : त्यानंतर अर्जासाठीची फी ऑनलाईन पद्धतीने भरून सबमीट या बटणावर क्लिक करा.

स्टेप 6 : तुम्ही भरलेल्या अर्जाची एक प्रिटं काढून घ्या..

अर्ज दाखल करण्यापूर्वी जाहिरात आणि सूचना काळजीपूर्वक वाचा

एमएचटी सीईटी 2022 प्रवेश परीक्षेसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा 2022 साठी जाहीर केलेल्या सूचना आणि विविध अटी अर्ज दाखल करण्यापूर्वी वाचण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.अर्ज दाखल करण्यापूर्वी पात्रता, परीक्षा शुल्क आणि इतर माहिती तपासून घेणं आवश्यक आहे. अर्जात चूक झाल्यास दुरुस्ती करता येणार नाही. अर्ज करताना योग्य माहिती भरावी, असं आवाहन करण्यात आलंय.

इतर बातम्या:

‘कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आदेश दिला’, रवी राणांचा आरोप

Nagpur | नितीन गडकरींच्या घरासमोर भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय?

MHT CET 2022 Registration starts form today at mhtcet2022.mahacet.org check details here

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.