MHT-CET : परीक्षेच्या रजिस्ट्रेशनची तारीख पुढे ढकलली, नवी तारीख वाचा एका क्लिकवर

MHT-CET परीक्षेच्या रजिस्ट्रेशन ची तारीख पुढे ढकलण्यात आलीये. विद्यार्थी ११ मे २०२२ च्या मध्यरात्री पर्यंत MHT-CET परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय.

MHT-CET : परीक्षेच्या रजिस्ट्रेशनची तारीख पुढे ढकलली, नवी तारीख वाचा एका क्लिकवर
MHT-CET : परीक्षेच्या रजिस्ट्रेशनची तारीख पुढे ढकललीImage Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 6:17 PM

मुंबई :  MHT-CET परीक्षेच्या (CET Exams) रजिस्ट्रेशनची तारीख (Registration Dates) पुढे ढकलण्यात आलीये. विद्यार्थी 11 मे 2022 च्या मध्यरात्री पर्यंत MHT-CET परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. विद्यार्थ्यांच्या (Students) मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. MHT-CET, MBA/MMS, MCA, M-ARC and M-HMCT या सीईटी परीक्षांसाठी उमेदवार 11 मे 2022 च्या मध्यरात्री पर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतात.

सीईटी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. इतर परीक्षांदरम्यान एमएचटी सीईटी असेल तर विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ शकतो म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांनी ट्विटरवर एमएचटी सीईटी परीक्षांची तारीख पुढे ढकलल्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली होती. इतर परीक्षांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं दरम्यान आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या या सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या परीक्षेच्या तारखांचं सविस्तर वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता तंत्रशिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे सुधारित अंदाजित वेळापत्रक अशा नावाने या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे.

प्रथम वर्ष अभियांत्रिकी महा-एमएचटी-सीईटी / प्रथम वर्ष औषध निर्माणशास्त्र महा-एमएचटी-सीईटी

  • पीसीएम (PCM) ग्रुप – 05 ते 11 ऑगस्ट, 2022
  • पीसीबी (PCB) ग्रुप – 12 ते 20 ऑगस्ट, 2022 (15, 16 व 17 ऑगस्ट वगळून )

एमबीए, एमएमएस, एमसीए, एम.आर्च, बी.प्लॅनिंग इत्यादी आणि आणखी अभ्यासक्रमासाठीची सीईटी आणि त्यांच्या तारखा वेळापत्रकात नमूद केलेल्या आहेत. या अधिकृत वेबसाईटवर सविस्तर माहिती आणि तारखा दिलेल्या आहेत. दरम्यान या संदर्भातली माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे दिलेली आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.