AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, मायक्रोसॉफ्ट आणतंय खास फीचर

मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या व्हिडीओ मीटमध्ये नवीन फीचर आणत आहे. Microsoft meet

ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, मायक्रोसॉफ्ट आणतंय खास फीचर
फिशिंगसाठी मायक्रोसॉफ्टच्या नावाचा सर्वाधिक वापर
| Updated on: May 05, 2021 | 5:12 PM
Share

नवी दिल्ली : जगातील आघाडीची कंपनी मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या व्हिडीओ मीटमध्ये नवीन फीचर आणत आहे. मायक्रोसॉफ्टचं व्हिडीओ मीट आणि सहाय्यकारी मंचच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी एक फीचर आणत आहे. या फीचरमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणं सुकर होणार आहे. याला रीडिंग प्रोग्रेस म्हटलं जातं. यामध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या धड्याचा अभ्यास करण्यासाठी व्हिडीओ मीटवर रेकॉर्डिंग करण्याची परवानगी देण्यात येईल. द वर्जच्या रिपोर्टनुसार या टुलचा फायदा विद्यार्थ्यासह शिक्षकांना देखील होणार आहे.(Microsoft to help students in online classes by adding new features in video meet)

शिक्षकांना काय फायदा?

मायक्रोसॉफ्टच्या व्हिडीओ मीटद्वारे शिक्षक त्यांच्या अध्यापनाची गती, अचूकता वाढवू शकतात. मायक्रोसॉफ्ट ऑक्टोबर पासून 350 शिक्षकांच्या मदतीनं चाचणी करणार आहे. हे फीचर लवकर वापरकर्त्यांसाठी मोफत असेल.

द वर्जनं दिलेल्या माहितीनुसार शिक्षकांना मायक्रोसॉफ्ट मीटवर एक डॅशबोर्ड दिसेल यामध्ये प्रति मिनिट शब्द आणि अचूकतेचा दर दाखवेल. यामध्ये त्यांना एका शब्दासाठी एखाद्या विद्यार्थ्याचं ऐकण्याची मुभा असेल. जर शिक्षक ऑटो डिटेक्शन सुविधा सुरु करु इच्छित नसतील तर ते बंद करु शकतात. यानंतर ते एका विद्यार्थ्याच्या वाचनाचा व्हिडीओ पाहू शकतात. हे फीचर मॅन्युअल पद्धतीनं वापरता येईल.

मायक्रोसॉफ्टनं 300 सुविधा वाढवल्या

कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात मायक्रोसॉफ्टशी ऑनलाईन शिक्षणासंदर्भात मायक्रोसॉफ्टशी अनेक टीम जोडलेल्या आहेत. या टीममध्ये 145 मिलीयन दैनिक वापरकर्ते आहेत. कंपनीनं गेल्या वर्षभरात 300 सुविधा वाढवल्या आहेत. तर, आणखी 100 सुविधा वाढवण्यात येणार आहेत.

संबधित बातम्या

IGNOU Admission 2021: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातील अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला 15 जूनपर्यंत मुदतवाढ

JEE Main 2021 May Postponed : जेईई मेन मे सत्राची परीक्षा लांबणीवर, विद्यार्थ्यांच्या मागणीला यश

(Microsoft to help students in online classes by adding new features in video meet)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.