NTS exam : 16 जानेवारीची राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा लांबणीवर, नव्या तारखा कधी जाहीर होणार? MSEC च्या घोषणेकडे लक्ष

प्रशासकीय कारणामुळं 16 जानेवारीची परीक्षा रद्द करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीनं नवीन तारीख नंतर जाहीर येईल, असं उपायुक्त शैलजा दराडे यांनी कळवलं आहे.

NTS exam : 16  जानेवारीची राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा लांबणीवर, नव्या तारखा कधी जाहीर होणार? MSEC च्या घोषणेकडे लक्ष
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 1:55 PM

नाशिक: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीनं घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचं आयोजन 16 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार होतं. मात्र, प्रशासकीय कारणामुळं 16 जानेवारीची परीक्षा रद्द करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीनं नवीन तारीख नंतर जाहीर येईल, असं उपायुक्त शैलजा दराडे यांनी कळवलं आहे. एनटीएस परीक्षा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते.

ऐनवेळी परीक्षा लांबणीवर विद्यार्थ्यांचे हाल

प्रज्ञा शोध परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 16 जानेवारीला घेण्यात येणारी परीक्षा प्रशासकीय कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती आहे. 16 जानेवारीची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्यानं नवी तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. तर, राष्ट्रीय पातळीवरील प्रज्ञा शोध परीक्षा होणार 12 जून रोजी होणार आहे. अचानक परीक्षा पुढे ढकलल्या मुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत.

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेला अर्ज कुणाला करता येतो?

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा महाराष्ट्र सरकारनं मान्यता दिलेल्या शाळेतील दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याला देता येते. या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही गुणांची, वयाची आणि उत्पन्नाची अट नाही.

शिष्यवृत्ती किती मिळते?

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या अकरावी आणि बारावीच्या वर्गासाठी 1250 रुपये तर, पदवी शिक्षणासाठी 2 हजार रुपये आणि पुढील शिक्षणासाठी 2 हजार रुपये दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते.

टीईटी घोटाळ्या प्रकरणी एमसईसीचे आयुक्त अटकेत

आरोग्य भरती, म्हाडा परीक्षा पेपर फुटी आणि टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी एकूण 25 आरोपी अटकेत आहेत. तिन्ही परीक्षा संदर्भात एकमेकांशी घोटाळ्यात ते सहभागी आहेत, त्यांच्याकडून काही माहिती आपल्याला मिळाली, काही मालमत्ता ही जप्त करण्यात आलीय, असं अमिताभ गुप्ता म्हणाले. 2020 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेतील गैर प्रकाराबद्दल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी अटक केली असून सरकारनं त्यांना निलंबित केलंय.

इतर बातम्या:

12 आमदारांच्या निलंबनावर अजित पवार भाजपसोबत? 12 महिने कुणाला बाहेर न बसवण्याचं वक्तव्य

हा कसला सेनेचा आमदार, काय स्वत:ला शिवसैनिक म्हणवतो, लेकीवरील हल्ल्यानंतर खडसे आक्रमक

MSCE postpone exam date of NTSE National Talent Search Exam due to some problem

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.