NEET UG 2022: नीट यूजी 2022 ची आन्सर की आज जारी होणार! neet.nta.nic.in अधिकृत वेबसाईट

त्यासाठी त्यांना प्रत्येक प्रश्नासाठी 200 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर नीट यूजीचा निकाल 7 सप्टेंबरला जाहीर होणार आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी ऑब्जेक्शन विंडो बंद करण्यात येणार आहे.

NEET UG 2022: नीट यूजी 2022 ची आन्सर की आज जारी होणार! neet.nta.nic.in अधिकृत वेबसाईट
NEET UG Answer Key Objection WindowImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 2:58 PM

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) आज नीट यूजी 2022 साठी उत्तर की जाहीर करणार आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) दिलेल्या विद्यार्थ्यांना neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन आन्सर की डाऊनलोड करता येईल. आन्सर की प्रसिद्ध झाल्याने ऑब्जेक्शन विंडोही उघडेल. उमेदवारांकडे ठराविक कालावधीत उत्तर कीवर आक्षेप घेण्याचा पर्याय असेल. आज म्हणजे 30 ऑगस्ट रोजी ही ऑब्जेक्शन विंडो (Objection Window) उघडेल. “उमेदवारांना ओएमआर ग्रेडिंगविरोधात आक्षेप घेण्याची परवानगी दिली जाईल. त्यासाठी त्यांना प्रत्येक प्रश्नासाठी 200 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर नीट यूजीचा निकाल 7 सप्टेंबरला जाहीर होणार आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी ऑब्जेक्शन विंडो बंद करण्यात येणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळाला (Official Website) भेट देऊ शकतात. नीटची आन्सर की कशी डाऊनलोड करायची आणि त्यावर आक्षेप कसा घेता येईल, याची माहिती घेऊया.

NEET Answer Key कशी डाउनलोड करावी?

  • एनईईटी उत्तर की डाउनलोड करण्यासाठी, neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवर तुम्हाला ‘व्ह्यू नीट यूजी 2022 आन्सर की’ या लिंकवर क्लिक करावं लागेल.
  • आता तुम्हाला तुमचे लॉगिन क्रेडेन्शियल्स भरावे लागतील.
  • तुमच्या स्क्रीनवर नीट आन्सर की 2022दिसेल.
  • उत्तर की डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी त्याची प्रिंट आउट घ्या.

एनईईटी उत्तर कीवर आक्षेप कसा घ्यावा?

  • एनईईटी उत्तर कीवर आक्षेप घेण्यासाठी, neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • लॉगिन क्रेडेन्शियल्स भरून लॉगइन करा.
  • प्रोविजनल उत्तर कीच्या प्रश्नांवर आक्षेप घेण्यासाठी त्यांची निवड करा.
  • प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 200 रुपये नॉन रिफंडेबल फी भरावी लागेल.
  • शुल्क भरल्यावर तुम्ही अर्ज सबमिट करू शकता.

 18 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी एनईईटी यूजी प्रवेश परीक्षा दिली

यावर्षी, मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस आणि इतर यूजी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 18 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी एनईईटी यूजी प्रवेश परीक्षा दिली होती. नीट यूजी परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात आली होती, जी दुपारी 2 ते 5.20 या वेळेत घेण्यात आली होती. देशभरातील 497 शहरांमध्ये 3,570 परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. 18,72,343 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. याशिवाय परदेशातील 14 शहरांमध्ये परीक्षा केंद्रे सुरू करण्यात आली.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.