AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET UG Answer Key: नीट युजी प्रोव्हिजनल आन्सर की लवकरच जाहीर होणार! अधिकृत वेबसाइटवर जाऊन आन्सर की डाऊनलोड करता येणार

एनटीए (NTA) सर्व पेपरसाठी स्वतंत्र उत्तर की जारी करेल. एनटीए एनईईटी neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर एनईईटी यूजी उत्तर की जारी केली जाईल. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन आन्सर की डाऊनलोड करता येणार आहे.

NEET UG Answer Key: नीट युजी प्रोव्हिजनल आन्सर की लवकरच जाहीर होणार! अधिकृत वेबसाइटवर जाऊन आन्सर की डाऊनलोड करता येणार
Medical NEET UGImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 12, 2022 | 10:18 PM
Share

NEET UG 2022 Answer Key Date: National Eligibility Entrance Test-Undergraduate (NEET UG 2022) ची प्रोव्हिजनल आन्सर की लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनईईटी यूजी 2022 ची प्रोव्हिजनल आन्सर की (Provisional Answer Key) रविवार, 14 ऑगस्ट 2022 रोजी जारी केली जाऊ शकते. एनटीए (NTA) सर्व पेपरसाठी स्वतंत्र उत्तर की जारी करेल. एनटीए एनईईटी neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर एनईईटी यूजी उत्तर की जारी केली जाईल. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन आन्सर की डाऊनलोड करता येणार आहे.

प्रत्येक प्रश्नासाठी शुल्क भरावे लागणार

एनटीएद्वारे जारी केल्या जाणाऱ्या तात्पुरत्या उत्तर की वर विद्यार्थी आक्षेप नोंदविण्यास सक्षम असतील. आक्षेपाची नोंद करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नासाठी शुल्क भरावे लागणार आहे. कोणत्याही प्रश्नासाठी कोणत्याही विद्यार्थ्याने आक्षेप नोंदवला तर त्यांना 200 रुपये फी भरावी लागेल. शुल्क ऑनलाइन भरावे लागणार आहे. फी न भरता घेतलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही.

उत्तीर्णतेचे निकष 50 टक्के मानले जातात

नीट परीक्षेसाठी दरवर्षी पात्रता गुण वेगवेगळे असतात, हे स्पष्ट आहे. मात्र नियमानुसार नीट परीक्षेसाठी उत्तीर्णतेचे निकष 50 टक्के मानले जातात. परीक्षेत कोणत्याही विद्यार्थ्याला मिळालेले जास्तीत जास्त गुण हे 100 पर्सेंटाइल मानले जातात आणि त्यानुसार कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रता कट ऑफ म्हणून 50 पर्सेंटाइलला प्रवेश दिला जातो. त्याचबरोबर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पात्रता कट ऑफ 40 टक्के ठेवण्यात आला आहे. याशिवाय विद्यार्थी अधिक माहितीसाठी नीट यूजी वेबसाइटवर जाऊन अधिकृत नोटिफिकेशन वाचू शकतात.

भारताबाहेरील 14 शहरांमध्ये आयोजित केली होती NEET UG

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) 17 जुलै 2022 रोजी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा – अंडरग्रॅज्युएट (एनईईटी यूजी परीक्षा 2022) परीक्षा आयोजित केली होती. दुपारी 2:00 ते 5:20 या वेळेत ही परीक्षा घेण्यात आली. एनटीएने एनईईटी यूजी 2022 परीक्षा भारताबाहेरील 14 शहरांमध्ये आयोजित केली होती, ज्यात देशातील 497 जणांचा समावेश होता.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.