AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GPAT 2021 Result | ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट परीक्षेचा निकाल जाहीर, gpat.nta.nic.in वेबसाईटवर पाहा निकाल

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) GPAT परीक्षा 2021चा निकाल gpat.nta.nic.in जाहीर झाला आहे. GPAT 2021 exam result declared

GPAT 2021 Result | ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट परीक्षेचा निकाल जाहीर, gpat.nta.nic.in वेबसाईटवर पाहा निकाल
ग्रॅज्युएट फार्मससी ॲप्टिट्यूड टेस्ट
| Updated on: Mar 20, 2021 | 10:35 AM
Share

नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) GPAT परीक्षा 2021चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. (NTA GPAT Result 2021 declared) ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएट फार्मसी अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट या परीक्षा दिली असेल त्यांनी gpat.nta.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी. एनटीएच्या gpat.nta.nic.in या वेबसाईटवर GPAT 2021 परीक्षेचा निकाल पाहता येईल. एनटीएकडून यापूर्वी उत्तरतालिका जाहीर करण्यात आल्या होत्या. उत्तरतालिकांवर आक्षेप नोंदवण्यासाठी 11 मार्च 2021 पर्यंत संधी देण्यात आली होती. ( NTA GPAT 2021 result Graduate Pharmacy Aptitude Test 2021 result declared know how to check result)

4447 विद्यार्थी उत्तीर्ण

ग्रॅज्युएट फार्मसी अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट (GPAT 2021) परीक्षेमध्ये एकूण 45 हजार 505 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी 4447 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ग्रॅज्युएट फार्मसी अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट (GPAT 2021) चे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून करण्यात आले होते. ही परीक्षा 27 फेब्रुवारी रोजी झाली होती. ही परीक्षा देशपातळीवर घेतली जाते. फार्मसी अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर वर्गांना प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. 2018 नंतर या परीक्षेचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडे देण्यात आलं आहे.

निकाल पाहण्याची पद्धत (How to check result of NTA GPAT 2021)

नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतल्या गेलेल्या ग्रॅज्युएट फार्मसी अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट 2021 चा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना एनटीएच्या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर खाली दिलेल्या टिप्सचा वापर करुन निकाल पाहता येईल येईल.

1. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाईटवर gpat.nta.nic.in वर भेट द्यावी.

2. या वेबपेजवर Result for GPAT 2021 यावर क्लिक करावे

3. यानंतर ओपन झालेल्या लॉगीन विंडोमध्ये अर्ज क्रमांक आणि इतर माहिती टाकून लॉगीन करावं.

4. विद्यार्थ्यांना यानंतर GPAT 2021 परीक्षेचा निकाल उपलब्ध होणार आहे.

प्रवर्गनिहाय मेरिट

खुला: 359-186 आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग : 185-155 अनुसूचित जाती : 185-114 अनुसूचित जमाती : 183-87 ओबीसी : 185-152

परीक्षेचे स्वरुप

ग्रॅज्युएट फार्मसी अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट (GPAT 2021) परीक्षेत 125 प्रश्न विचारले जातात. एक प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जातो. ही परीक्षा देशातील विविध राज्यांमध्ये आयोजित केली जाते. उत्तर प्रदेशातील आग्रा, नोएडा, इलाहाबाद, बरेली, गाझियाबाद, गोरखपूर, ग्रेटर नोएडा, लखनऊ, वाराणसी, कानपूर आणि मेरठ मध्ये झाली होती. राजस्थानातील जयपूर, जोधपूर, कोटा आणि उदयपूर शहरातदेखील ग्रॅज्युएट फार्मससी अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट (GPAT 2021) परीक्षा घेतली जाईल. याशिवाय मध्य प्रदेश, बिहार, दिल्ली, आसाम, आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड आणि इतर राज्यांमध्ये आयोजित केली गेली.

संबंधित बातम्या

GPAT 2021 परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार?

Fact Check : मोदी सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप? या योजनेमागील सत्य काय?(Opens in a new browser tab)

( NTA GPAT 2021 result Graduate Pharmacy Aptitude Test 2021 result declared know how to check result)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.