Jee Main Result 2021: जेईई मेन्स परीक्षेत नवी मुंबईच्या अथर्व तांबटनं महाराष्ट्राची मान उंचावली, दुसऱ्यांदा मिळवली पहिली रँक

अथर्व तांबट यानं जेईई मेन परीक्षेत दुसऱ्यादा टॉपर्सच्या यादीत स्थान मिळवतं महाराष्टाराची मान उंचावली आहे.  jeemain.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटवर  विद्यार्थ्यांना निकाल उपलब्ध होईल.

Jee Main Result 2021: जेईई मेन्स परीक्षेत नवी मुंबईच्या अथर्व तांबटनं महाराष्ट्राची मान उंचावली, दुसऱ्यांदा मिळवली पहिली रँक
Atharva Tambat


Jee Main Result 2021नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या JEE MAIN 2021 च्या चौथ्या सत्राचा निकाल मध्यरात्री उशिरा जाहीर करण्यात आला. जेईई मेन परीक्षेत एकूण 18 विद्यार्थ्यांना टॉप 1 रँक मिळाली आहे. तर, 44 जणांना 100 परफेक्ट एनटीए गुण मिळाले आहेत. पहिली रँक मिळवणाऱ्या 18 जणांमध्ये महाराष्ट्राच्या अथर्व तांबट (Atharva Tambat)  या विद्यार्थ्याचा समावेश आहे. अथर्व तांबट यानं जेईई मेन परीक्षेत दुसऱ्यादा टॉपर्सच्या यादीत स्थान मिळवतं महाराष्टाराची मान उंचावली आहे.  jeemain.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटवर  विद्यार्थ्यांना निकाल उपलब्ध होईल.

महाराष्ट्राचा अथर्व तांबट पहिली रँक मिळवणाऱ्या टॉपर्सच्या यादीत

अथर्व अभिजित तांबट हा नवी मुंबईतील रेयान इंटनॅशनल स्कूल, सानपाडा या शाळेचा विद्यार्थी आहे. अथर्व यानं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेली जेईई मेन परीक्षा देखील दिली होती. फेब्रुवारी महिन्यातील परीक्षेत मिळालेला स्कोर सुधारण्यासाठी अथर्व तांबट यानं मार्च महिन्यातील परीक्षा दिली होती. जेईई मेन परीक्षा मार्चमध्ये त्यानं 300 पैकी 300 स्कोर केला होता. याशिवाय त्यानं सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेतही चांगले गुण मिळवले आहेत. फायनल रँकिंगमध्ये टॉप 1 रँक मिळवत अथर्व तांबट यांनं महाराष्ट्राची मान उंचावली आहे. अथर्व तांबट हा नवी मुंबईतील वाशी येथील रहिवासी आहे.

जेईई मेन सत्र 4 परीक्षा टॉपर्स

जेईई मेन 2021 सत्र 4 चा कसा पाहायचा?

स्टेप 1: निकाल तपासण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर भेट द्या.
स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करून लॉगिन करा.
स्टेप 4: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5: निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट घ्या

जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणी सुरु होणार

चौथ्या सत्राच्या निकालासोबत एनटीए ऑल इंडिया रँक आणि प्रवर्ग निहाय कट ऑफ लिस्ट जारी केली आहे. जेईई अॅडव्हान्सड परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. तिचा निकाल 15 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणी जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज सुरु होत आहे.

इतर बातम्या:

Jee Main Result 2021: जेईई मेन्स परीक्षा निकालात 2 मुलींची बाजी, दिल्लीची काव्या चोप्रा, तेलंगाणाच्या कोमा शरण्याला पहिली रँक

JEE Advanced 2021 : जेईई ॲडव्हान्सड परीक्षेची नोंदणी प्रक्रिया आजपासून, अर्ज कुठे करायचा?

JEE Main Result 2021: जेईई मेनचा निकाल जाहीर, नंबर 1 रँकवर 18 जण, महाराष्ट्राचा एकमेव अथर्व अभिजीत तांबट टॉपमध्ये

JEE Main 2021 March Result:जेईई मेन मार्च सत्रात महाराष्ट्रातील दोघांचा डंका, 100 एनटीए गुणांची कमाई


NTA JEE Main Results 2021 Maharashtra Athrava Tambat secured Top one Rank know about him jeemain.nta.nic.in Toppers and Pass Percentage in Marathi

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI