NEET Answer Key 2021: नीट यूजी परीक्षेची उत्तरतालिका लवकरच जाहीर होणार, विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा

नॅशनल टेस्टिंग एजन्सीव्दारे 12 सप्टेंबरला झालेल्या नीट यूजी परीक्षेची उत्तर तालिका लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. नीट परीक्षेची उत्तरतालिका एनटीएच्या अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वर जारी केली जाईल.

NEET Answer Key 2021: नीट यूजी परीक्षेची उत्तरतालिका लवकरच जाहीर होणार, विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा
NEET UG Answer Key
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 4:38 PM

NEET Answer Key 2021 : नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीव्दारे 12 सप्टेंबरला झालेल्या नीट यूजी परीक्षेची उत्तर तालिका लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. नीट परीक्षेची उत्तरतालिका एनटीएच्या अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वर जारी केली जाईल. राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश चाचणी परीक्षा दिलेले विद्यार्थी ऑफिशियल वेबसाईटवरुन उत्तरतालिका डाऊनलोड करुन शकतात. उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीखांच्या मदतीने लॉगीन करावं लागेल.

उत्तरतालिका जारी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यावर आक्षेप घेण्याची संधी दिली जाईल. उमेदवारांना एनटीए नीटच्या वेबसाईटवर लॉगीन करुन आक्षेप नोंदवावा लागेल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून पहिल्या उत्तर तालिकेवर आक्षेप आल्यास आणि त्यात सुधारणा करुन अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाईल.

नीट उत्तर तालिका कशी डाऊनलोड करायची?

स्टेप 1: विद्यार्थ्यांना प्रथम एनटीए नीटची अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in ला भेट द्यावी लागेल.

स्टेप 2: वेबसाईटवर दिलेल्या उत्तर तालिका लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3: आता अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेच्या मदतीने लॉगीन करा.

स्टेप 4: तुम्हाला उत्तर तालिका स्क्रीनवर दिसेल.

स्टेप 5: उत्तर तालिका तापूसन डाऊनलोड करा.

16 लाख विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा

नीट यूजी परीक्षेसाठी 16 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. एनटीएकडून अंतिम उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट यूजी परीक्षा आयोजित करण्यात येते. 55 हजार जागांसाठी जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानं या परीक्षेतील स्पर्धा तीव्र असते.

नीट यूजी परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये

गेल्या वर्षी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत 13 सप्टेंबर रोजी नीट परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला एकूण 13.66 लाख उमेदवार परीक्षेला बसले होते, त्यापैकी 7,71,500 विद्यार्थी पात्र ठरले होते. यावर्षी ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू आणि उर्दू या 11 भाषांमध्ये घेण्यात आली आहे.

नीट परीक्षा रद्द करा, महाराष्ट्र काँग्रेसची मागणी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेतली. नाना पटोलेंनी यावेळी विविध मुद्यावर भूमिका मांडली. नीट परीक्षेमध्ये उघड झालेल्या गैरप्रकारांवर त्यांनी बोट ठेवलं. नीट परीक्षेला देशभरातून जवळपास 16 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. यावर्षी नागपूर असेल जयपूर अशा ठिकाणी हा पेपर लीक झाला. या घटनेमुळं अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. यामुळं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तामिळनाडूनमध्ये राज्य सरकारनं नीट बंद करून बारावीच्या गुणांच्या आधारावर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, तसा निर्णय महाराष्ट्रात व्हावा यासाठी भूमिका घ्यावी, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यासदंर्भात मागणी केली असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

इतर बातम्या:

NEET परीक्षा रद्द करा, तामिळनाडू प्रमाणं मेडिकल प्रवेशाचा निर्णय घ्या; काँग्रेसची मागणी, उद्धव ठाकरेंना पत्र

NEET PG Admit Card : नीट पीजी परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?

NTA NEET Answer Key 2021 to be release soon at neetnta.nic.in check here for download

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.