AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SAFAL आणि AI For All पोर्टलचं नरेंद्र मोदी यांच्याकडून लाँचिग, जगाच्या एक पाऊल पुढं राहण्याचं तरुणांना आवाहन

नरेंद्र मोदी सरकारनं गेल्या वर्षी 29 जुलै रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलं होतं. नव्या शिक्षण धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

SAFAL आणि AI For All पोर्टलचं नरेंद्र मोदी यांच्याकडून लाँचिग, जगाच्या एक पाऊल पुढं राहण्याचं तरुणांना आवाहन
PM Narendra Modi
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jul 29, 2021 | 9:01 PM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित केलं. नरेंद्र मोदी सरकारनं गेल्या वर्षी 29 जुलै रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलं होतं. नव्या शिक्षण धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. नरेंद्र मोदी यांनी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी SAFAL आणि AI For All पोर्टल लाँच केलं आहे.

SAFAL

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त नरेंद्र मोदी यांनी सीबीएसईच्या शाळांमध्ये तिसरी, पाचवी आणि आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन स्वरुप, स्ट्रक्चर्ड असेसमेंट फॉर अनॅलिसिस लर्निंग लेवल (SAFAL) ची सुरुवात करण्यात आल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. नरेंद्र मोदी यांनी भारतातील युवकांनी जगात कायम एक पाऊल पुढं असलं पाहिजे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोग्य, संरक्षण, इन्फास्ट्रक्चर, टेक्नॉलॉजी या मध्ये भारतीय युवकांनी आत्मनिर्भर व्हावं असं मोदी म्हणाले.

AI For All पोर्टल

आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सामान्य माहिती देशातील प्रत्येक नागरिकाला असाव यासाठी AI For All पोर्टल सुरु करत आहोत, असं मोदी म्हणाले. सीबीएसई, केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि इंटेल इंडियाद्वारे याचं संचलन केलं जाईल.

14 अभियांत्रिकी महाविद्यालयात 5 भाषेत अभ्यासक्रम सुरु

8 राज्यातील 14 अभियांत्रिकी महाविद्यालय मातृभाषेत अभ्यासक्रम सुरु होत आहेत. 5 प्रादेशिक भाषांमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण सुरु होत आहे. यामध्ये हिंदी, तामिळ, तेलुगू, मराठी आणि बांगला भाषेचा समावेश आहे. तर देशातील 11 भाषांमध्ये अभ्यासक्रम भाषांतरीत करण्यात येत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. देशातील गरीब विद्यार्थ्यांना, मध्यम वर्गातील आणि दलित, आदिवासी वर्गातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. या वर्गातील विद्यार्थ्यांना भाषेच्या अडचणीला सामोरं जावं लागत होतं. या विद्यार्थ्यांच्या सामर्थ्य आणि कौशल्यासोबत फायदा होईल, असंही ते म्हणाले.

इतर बातम्या:

इंजिनिअरिंग आता मराठीसह 5 प्रादेशिक भाषांमध्ये, 8 राज्यातील 14 महाविद्यालयात कोर्सेस सुरु, नरेंद्र मोदींची माहिती

Big News: मेडिकल अभ्यासक्रमात OBC आणि EWS आरक्षण लागू, मोदी सरकारचं मोठं पाऊल

PM Narendra Modi launched SAFAL and AI for All on Completion of one year New Education Policy 2020

Follow Us
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?