बोर्डाच्या परीक्षा घेता येत नसतील तर राजीनामा द्या, प्रकाश आंबेडकर यांचा राज्य सरकारवर निशाणा

बोर्डाच्या परीक्षा घेता येत नसतील तर राजीनामा द्या, प्रकाश आंबेडकर यांचा राज्य सरकारवर निशाणा
प्रकाश आंबेडकर

बोर्डाच्या परीक्षा सुरक्षित वातावरणात आयोजित केल्या जाऊ शकतात, असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. Prakash Ambedkar Thackeray Government

Yuvraj Jadhav

|

May 25, 2021 | 5:19 PM

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारने 10 वी आणि 12 वी च्या परीक्षांबाबत घेतलेला निर्णय विद्यार्थांचं नुकसान करणारा असल्याची टीका केली आहे. बोर्ड परीक्षा सुरक्षितपणे घेता येऊ शकतात. बोर्डाच्यापरीक्षा घ्याव्या नाही तर राज्य सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. (Prakash Ambedkar slams Thackeray Government over SSC HSC Board exams)

बोर्ड परीक्षा घेता येत नसतील तर राजीनामा द्यावा

प्रकाश आंबेडकर यांनी बोर्ड परीक्षांच्या आयोजनांवरुन राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. बोर्ड परीक्षा सुरक्षित वातावरणामध्ये घेता येऊ शकतात. मात्र, राज्य सरकारला त्या घेता येत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

परीक्षा रद्द केल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान

दहावी किंवा बारावीच्या परीक्षा या महत्वाच्या असतात. बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्यास तो विद्यार्थ्यांचं नुकसान करणारा असेल, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. बोर्डाच्या परीक्षा सुरक्षित वातावरणात आयोजित केल्या जाऊ शकतात, असं देखील ते म्हणाले.

राज्य शासन दोन दिवसात दहावी परीक्षेबाबत जी आर काढणार

राज्य सरकारचा शिक्षण विभाग दहावीबाबत एक ते दोन दिवसात दोन महत्त्वाचे जीआर काढणार असल्याची माहिती आहे. या शासन निर्णयांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना कसं उत्तीर्ण करायचं याबाबतचे निकष याविषयची माहिती असेल. दुसऱ्या शासन निर्णयात अकरावीचे प्रवेश कसे होणार याचे निकष शिक्षण विभागाकडून जाहीर केले जातील.

शासन निर्णयाची माहिती मुंबई हायकोर्टाला कळवणार

राज्याच्या शिक्षण खात्यांच्या अधिकाऱ्यांनी काल आणि आज अशी दोन दिवस राज्याचे महाधिवक्तां यांच्याबरोबर चर्चा केली असल्याची माहिती आहे. राज्य शासनाकडून काढण्यात येत असलेल्या शासन निर्णयाची माहिती मुंबई हायकोर्टात दिली जाणीर आहे. या दोन्ही जीआरची माहिती गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली जाणार असल्याच स्पष्ट झालं आहे.

संबंधित बातम्या:

बारावीच्या परीक्षा झाल्याच पाहिजेत, ऑनलाईन परीक्षा हा देखील पर्याय, बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचं मत

दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावर राज्य सरकार ठाम, दोन दिवसांत अंतिम निर्णय‌, सूत्रांची‌ माहिती

(Prakash Ambedkar slams Thackeray Government over SSC HSC Board exams)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें