प्राध्यापक भरतीसाठी शिक्षक दिनी पुण्यात आंदोलन, तोंडाला काळं फासत सरकारविरोधात संताप

योगेश बोरसे

| Edited By: |

Updated on: Sep 05, 2021 | 2:31 PM

महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेच्या नेतृत्वात पुण्यातील शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर 19 जुलैपासून आंदोलन करण्यात येत आहे. सेट नेट पात्रताधारकांच्या या आंदोलनाला 49 दिवस उलटले आहेत. प्राध्यापकांच्या या मागण्यांकडे राज्य सरकारकडून कसा प्रतिसाद दिला जातोय, हे पाहावं लागणार आहे.

प्राध्यापक भरतीसाठी शिक्षक दिनी पुण्यात आंदोलन, तोंडाला काळं फासत सरकारविरोधात संताप
प्राध्यापकांचं आंदोलन

Follow us on

पुणे: आपल्या विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांनी आज पुण्यातील शिक्षण संचालनालय कार्यालयाबाहेर तोंडाला काळे फासून आंदोलन केले. प्राध्यापक भरतीवरील बंदी तात्काळ उठवावी, महाविद्यालय,अकृषी विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात विनाअट 100 टक्के प्राध्यापक भरती करावी. सीएचबी प्राध्यापकांना थकीत वेतन मिळावे यासह अनेक मागण्यांसाठी काळे फासून आंदोलन करण्यात आले. आजच्या शिक्षकदिनी प्राध्यापकांकडून आंदोलन करण्यात आले

आंदोलनाचा 49 वा दिवस

महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेतर्फे गेल्या 49 दिवसांपासून प्राध्यापक भरतीसाठी आंदोनल करण्यात येत आहे. पुण्यात पात्रताधारकांकडून प्राध्यापक भरतीसाठी तोंडाला काळं फासून आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रात प्राध्यापकांच्या 18 हजार जागा रिक्त आहेत. तर, राज्यात 80 हजार पात्रताधारक आहेत. महाराष्ट्र सरकारनं 100 टक्के प्राध्यापक भरती सुरु करावी, अशी मागणी आंदोलक प्राध्यापकांनी केली आहे.

स्वातंत्र्यदिनी अर्धनग्न आंदोलन

महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठं आणि अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीवर घालण्यात आलेली बंदी उठवावी यासाठी पुण्यात 19 जुलैपासून आंदोलन सुरु आहे. 100 टक्के पदभरती करावी, सीएचबी प्राध्यापकांचं थकित मानधन द्यावं या मागणीसाठी पुण्यात महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेच्या वतीनं आंदोलन सुरु आहे. स्वातंत्र्यदिनादिवशी राज्य सरकारनं मागण्यांकडे लक्ष द्यावं, यासाठी आंदोलक प्राध्यापकांच्या अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं होतं.

आंदोलकांच्या मागण्या

प्राध्यापक भरतीवरील बंदी तात्काळ उठवावी, सीएचबी प्राध्यापकांना थकित वेतन द्यावं, या मागण्यांसाठी तोंडाला काळं फासून आंदोलन कऱण्यात आलं. पुण्यातील शिक्षण सहसंचालक कार्यालयाबाहेर प्राध्यापकांनी हे आंदोलन केलं आहे. महाविद्यालय,अकृषी विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात विनाअट 100 टक्के प्राध्यापक भरती करावी या प्रमुख मागणीसाठी आंदोलन सुरु आहे.

आंदोलक प्राध्यापकांची भूमिका

राज्यात गेल्या अकरा वर्षांपासून प्राध्यापक भरती नियमितपणे होत नाही. राज्यातील महाविद्यालयातील पन्नास टक्के जागा रिक्त असल्यानं शिक्षणावर परिणाम होत आहे. सेट नेट परीक्षांचं आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. मात्र, त्याप्रमाणं भरती होत नाही. राज्य सरकारच्या वतीनं फक्त आश्वासन देण्यात येत आहेत. उदय सामंत यांनी आश्वासन दिलं होतं त्यावर कार्यवाही झालेली नाही. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काही दिवसांपूर्वी आंदोलकांनी भेट घेतली होती. राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील सीएचबी प्राध्यापकांना थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी देखील आंदोलन सुरु आहे.

महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेच्या नेतृत्वात पुण्यातील शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर 19 जुलैपासून आंदोलन करण्यात येत आहे. सेट नेट पात्रताधारकांच्या या आंदोलनाला 49 दिवस उलटले आहेत. प्राध्यापकांच्या या मागण्यांकडे राज्य सरकारकडून कसा प्रतिसाद दिला जातोय, हे पाहावं लागणार आहे.

इतर बातम्या:

भागवत कराडांचे मुंडे कुटुंबीयांशी संबंध कसे?, नेमकं काय म्हणाले कराड?; वाचा सविस्तर

अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई, जरा धीर धरा, राजकारण आपलं होतं, पण जीव जनतेचा जातो; मुख्यमंत्र्यांनी फटकारले

Professor Recruitment Protest at Pune from last 49 days by Maharashtra Nav Pradhyapak Sanghtana on the occasion of Teachers Day protesters colour their faces with Black Colour

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI