AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC Exam 2023 : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावी बोर्डाने (SSC and HSC board) विद्यार्थ्यांना दिलासा देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.

SSC Exam 2023 : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Feb 15, 2023 | 5:04 PM
Share

पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षा बोर्डाने (SSC Board Exam) एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात मधल्या दोन वर्षांच्या काळात कोरोना संकटामुळे (Corona Pandemic) दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर न जाता ऑनलाईन परीक्षा द्यावी लागली होती. विशेष म्हणजे सर्वच इयत्तेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा मधल्या दोन वर्षाच्या काळात ऑनलाईनच झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाल्याचं पालकांचं मत आहे. पालकांच्या याच मताचा विचार करुन दहावी-बारावी परीक्षा बोर्डाने विद्यार्थ्यांच्या हिताचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता पेपर लिहिण्यासाठी दहा मिनिटांचा वेळ वाढवून मिळणार आहे. बोर्डाने नुकतंच 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र विद्यार्थ्यांना आता पेपर लिहिण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटं जास्त वेळ मिळणार आहे.

विशेष म्हणजे बोर्डाने याबाबत परिपत्रक काढत माहिती जारी केलीय. दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर बोर्डाकडून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.

परीक्षा केंद्राजवळील झेरॉक्स दुकाने बंद राहणार

दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्या यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली तयार केली आहे. येणाऱ्या शालांत परीक्षा ह्या कॉपीमुक्त करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेप्रमाणे तहसीलदार स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी आणि इतर कर्मचारी यांची फिरती पथक तैनात करण्यात येणार आहेत.

तालुका स्तरावरील अधिकारी या सर्व परीक्षा केंद्रांवर जाऊन या सगळ्याचा आढावा घेणार आहेत. तसेच कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी नियमांचं काटेकोर पालन केलं जाईल. या परीक्षा केंद्रांवर मोबाईल आणि स्मार्ट वॉच घेऊन जाण्याची प्रतिबंध लावण्यात आल्याची माहिती देखील समोर आलीय.

नागपूर जिल्हा कॉपीमुक्त ठेवण्याचा निर्धार

परिक्षा केंद्रावर मोबाईल दिसल्यास केंद्र प्रमुखावर कठोर कारवाई होणार आहे. विशेष म्हणजे नागपूर जिल्हा कॉपीमुक्त ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील संकल्प केलाय.

दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये मास कॉपी झाल्यास केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आलाय. याबाबत नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत.

परिक्षेत तालुकास्तरावर संपूर्ण यंत्रणेवर तहसीलदारांचे नियंत्रण असेल. जिल्हा स्तरावरून स्वतः जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात भरारी पथक तैनात असतील, असं स्पष्ट करण्यात आलंय.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.