बारावीनंतर घ्या विदेशात शिक्षण; या पाच देशात चांगल्या संधी

काही देशात मोफत शिक्षण दिले जाते. आता तु्म्हाला अशा पाच देशांची यादी देत आहोत, जिथं तुम्ही बारावीनंतर कमी खर्चात चांगले शिक्षण घेऊ शकता.

बारावीनंतर घ्या विदेशात शिक्षण; या पाच देशात चांगल्या संधी
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 1:24 PM

नवी दिल्ली : विदेशात डिग्री मिळवायची असेल तर जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. कमी खर्चात कोणत्या देशात बारावीनंतर शिक्षण होते, याची माहिती येथे घेणार आहोत. विदेशात शिक्षण करावं, असं काही विद्यार्थ्यांचं स्वप्न असते. परंतु, बरेच विद्यार्थी महागडे शुल्क आणि विदेशात राहण्याचा खर्च करू शकत नाही. त्यामुळं त्यांचे विदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. असेही काही विद्यार्थी असतात जे विदेशात कमी खर्चात आपलं शिक्षण पूर्ण करतात. जिथल्या डिग्रीला मान्यता आहे, अशा देशात जाणे विद्यार्थी पसंत करतात. शिवाय जास्त पैसे खर्चसुद्धा व्हायला नकोत. काही देशात मोफत शिक्षण दिले जाते. आता तु्म्हाला अशा पाच देशांची यादी देत आहोत, जिथं तुम्ही बारावीनंतर कमी खर्चात चांगले शिक्षण घेऊ शकता.

रशिया – युरोप ते आशिया खंडापर्यंत पसरलेला रशिया हा देश भारताचा सहयोगी देश आहे. रशिया हा भारतीय मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी चांगले ठिकाण आहे. कमी खर्चात मेडिकलचे शिक्षण येथे मिळते. डिग्री पूर्ण केल्यानंतर तेथे १८० दिवस राहून नोकरी शोधता येते.

जर्मनी – युरोपचा पॉवरहाऊस असं वर्णन जर्मनीचं केलं जातं. जर्मनीत प्रतिष्ठित कॉलेज आणि विद्यापीठं आहेत. येथील बऱ्याच संस्थांमध्ये शिकवणी शुल्क देण्याची गरज पडत नाही. जगात जर्मनी ट्यूशन फ्री शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. राजधानी बर्लिनसह देशभरातील कॉलेजमध्ये ट्युशन फी न देता शिक्षण घेता येते.

ब्राझील – दक्षिण अमेरिकेतील या देशात पब्लिक युनिव्हर्सिटीत भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी शुल्क लागत नाही. परंतु, प्रवेशापूर्वी पोर्तुगीज भाषेची टेस्ट द्यावी लागते. प्रसिद्ध विद्यापीठांमध्ये फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ कॅटरिना, फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ एबीसी, पोटेंशियल कॅथॉलिक युनिव्हर्सिटी आणि रिओ डी जानेरिओ यांचा समावेश होतो.

ऑस्ट्रिया – युरोपीयन देशात कमी शुल्क घेण्यासाठी ऑस्ट्रिया विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रीय आहे. बारावी पास विद्यार्थी पदवीसाठी व्हियन्ना युनिव्हर्सिटी आणि साल्जबर्ड युनिव्हर्सिटीमध्ये कोणते कोर्सेस आहेत, ते पाहू शकता.

नार्वे – आपल्या प्राकृतिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेला देश विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण देण्याची योजना घेऊन आला आहे. मोफत शिक्षणासाठी येथील पब्लिक युनिव्हर्सिटीत प्रवेश घेता येतो. बर्गन युनिव्हर्सिटी, युआयटी नार्वेची आर्कटिक युनिव्हर्सिटी विदेशी विद्यार्थ्यांसाठी कमी खर्चात शिक्षण देतात.

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.