आर्ट्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेत ‘हे’ खास कोर्स? 70 लाखांपर्यंत पॅकेज, जाणून घ्या
अमेरिका हे उच्च शिक्षणाचे केंद्र मानले जाते, याचे मुख्य कारण येथे एक-दोन नव्हे, तर डझनभर अव्वल विद्यापीठे आहेत. अभियांत्रिकी असो वा राज्यशास्त्र येथील विद्यापीठांमध्ये सर्व प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात. आज आम्ही तुम्हाला याचविषयी विस्ताराने माहिती देणार आहोत.

उच्च शिक्षण क्षेत्रात अमेरिकेचे नाव ऐकल्यावर अनेकांना असे वाटते की येथे केवळ अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शिकवले जाते. पण वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे. अमेरिकेत एकापेक्षा जास्त महाविद्यालये आहेत, जिथे कला किंवा मानव्यविद्या शाखेतून शिकणारे विद्यार्थीही जाऊन प्रवेश घेऊ शकतात. येथे आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना असे काही कोर्सेसही शिकवले जातात, त्यानंतर त्यांना महिन्याला लाखो रुपयांची नोकरी मिळते. चला तर मग जाणून घेऊया अशाच कोर्सेसबद्दल.
मानव्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेत लोकप्रिय अभ्यासक्रम कोणते?
बॅचलर्स इन इंग्लिश
इंग्रजी साहित्यात रस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बॅचलर्स इन इंग्लिश हा चांगला कोर्स ठरू शकतो. बारावीनंतर हार्वर्ड युनिव्हर्सिटी, येल युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी सारख्या टॉप इन्स्टिट्यूटमध्ये बीए इन इंग्लिशचे शिक्षण घेता येते. अमेरिकेत इंग्रजीतून बीए करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सरासरी वार्षिक वेतन 53,610 डॉलर (सुमारे 46.50 लाख रुपये) आहे.
बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन
भारतीय विद्यार्थी बारावीनंतर अमेरिकेत जाऊन पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनमध्येही पदवी घेऊ शकतात. कोर्स संपल्यानंतर त्यांना अनेक मीडिया हाऊसमध्ये नोकऱ्या मिळतील. जाहिरात, ब्रँडिंग, सोशल मीडिया, मार्केटिंग, मीडिया रिसर्च, ब्रॉडकास्ट न्यूज अशा ठिकाणीही ते काम करू शकतात. या कोर्सनंतर तुम्हाला वार्षिक सरासरी 60,979 डॉलर (जवळपास 53 लाख रुपये) मिळू शकते.
बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन
बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन हा कला शाखेतून बारावी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम कोर्स आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना फॅशन इंडस्ट्री आणि पादत्राणे, दागिने आदींचे डिझाइन शिकवले जाते. या पदवीमुळे तुम्हाला फॅशन इंडस्ट्रीत चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सरासरी वार्षिक वेतन 79,290 डॉलर (सुमारे 69 लाख रुपये) पर्यंत आहे.
बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट
अमेरिकेत हॉटेल इंडस्ट्री खूप मोठी आहे, त्यामुळे नोकऱ्यांची अजिबात कमतरता नाही. बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये विद्यार्थी पर्यटन, लॉजिंग मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट आणि फूड इंडस्ट्रीबद्दल शिकतात. मोठमोठ्या हॉटेल्सपासून रेस्टॉरंटपर्यंत त्यांना नोकऱ्या मिळतात. या पदवीनंतर विद्यार्थ्यांचे सरासरी वार्षिक वेतन 65,360 डॉलर (सुमारे 57 लाख रुपये) आहे.
बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन
बिझनेस ग्रॅज्युएट्सना जगभरात मागणी आहे. सेल्स, मार्केटिंग, फायनान्स, एज्युकेशन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात पदवीधरांची गरज आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना केवळ व्यवसायाचे गुणशिकवले जात नाहीत, तर ते व्यवसाय पुढे नेण्याविषयीही शिकतात. या अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांचे सरासरी वार्षिक वेतन 69,117 डॉलर (सुमारे 60 लाख रुपये) आहे.
