AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खातेधारकांची एकच धावपळ, देशभरात अनेक शाखा असणाऱ्या बँकेवर RBI ची ॲक्शन

New India Cooperative Bank : मुंबईत सकाळीच या बँकेच्या शाखेसमोर ग्राहकांची एकच गर्दी उसळली. बँकेवर कारवाई झाल्यानंतर ठेवी काढण्यासाठी ग्राहकांची धावपळ उडाली. केंद्रीय बँकेने या सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे.

खातेधारकांची एकच धावपळ, देशभरात अनेक शाखा असणाऱ्या बँकेवर RBI ची ॲक्शन
| Updated on: Feb 14, 2025 | 3:17 PM
Share

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर 6 महिन्यांसाठी बंदी घातली आहे. RBI च्या कारवाईनंतर बँकेतून पैसे काढण्यासाठी व्यापारी आणि ठेवीदारांनी एकच गर्दी केली. त्यांनी कर्मचाऱ्यांवर प्रश्नाचा भडिमार केला. त्यामुळे या बँकेच्या शाखेबाहेर मोठी गर्दी आणि गोंधळ उडाला होता. या बँकेच्या देशात 26 शाखा आहेत. त्यात लाखो खातेदारांचे पैसे आहेत. आता त्यांना या कारवाईनंतर मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुण्यापासून ते पालघरपर्यंत या बँकेत लाखो ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. पैसे काढण्यासाठी खातेदारांची लांबच लांब रांग लागली आहे.

आता कर्जदारांचे काय होणार?

बँकेत अनेक लोकांचे कर्ज सुरू आहेत. या बँकेत ज्यांच्यावर कर्ज आहे, त्यांचे पुढे काय होणार? त्यांचा सिबील स्कोअर खराब होईल का, असे अनेक प्रश्न कर्जदारांना पण सतावत आहेत. त्यांच्यावर आता अधिक व्याजाचा बोजा पडणार का अशी पण त्यांना भीती आहे.

तुमच्या कर्जाचे काय होणार?

बँक बंद झाल्यावर, बँकेच्या मालमत्ता, स्थावर, जगंम संपत्ती विक्री करून त्यातून खातेदारांची रक्कम देण्यात येते. तुम्ही कर्जदार असाल तर तुमचे कर्ज खाते हे दुसऱ्या बँकेत हस्तांतरीत करण्यात येते. या ठिकाणी तुम्हाला कर्जाची फेड करावी लागते. त्यासंबंधीचे नियम संबंधित नवीन बँके तुम्हाला स्पष्ट करते. साधारणपणे बंद पडलेल्या सर्व कर्जदारांची खाती हे एकाच बँकेत हस्तांतरीत करण्यात येतात. अथवा काही वेळा त्या विविध बँकेत हस्तांतरीत करण्यात येतात.

FDIC आणि नवीन बँक कर्जदाराला त्याच्या खात्याची आणि झालेल्या व्यवहाराची सर्व माहिती देते. एक लिखित नोटीस पाठवण्यात येते. त्यानंतर नवीन बँक हप्ता कापण्यापूर्वी कर्जदाराची संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतो. तर हप्ता कापतीपूर्वी बँक खातेदाराला पूर्वसूचना देते. त्यात उरलेल्या हप्त्याविषयी, व्याजदर आणि इतर प्रक्रियेविषयीची सर्व माहिती देण्यात येते. त्यानंतर कर्जाचा हप्ता सुरू होतो. यापूर्वीच्या हप्ते ग्राह्य धरण्यात येतात. त्यासंबंधीचे सेटलमेंट करण्यात येते. त्यानंतर या बँकेत कर्जप्रकरण सुरू होते.

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...