10 किमी पायपीट करून रोज शाळेत जायचा, कर्ज काढून शिक्षण केलं पूर्ण; शेतकऱ्याचा मुलगा असा बनला IAS अधिकारी !

IAS Success Story : वीर प्रताप सिंह राघव या शेतकऱ्याच्या मुलाने लहानपणापासूनच गरिबी अनुभवली होती. शाळेत जाण्यासाठी तो दररोज 10 किमीचा प्रवास करत असे.

10 किमी पायपीट करून रोज शाळेत जायचा, कर्ज काढून शिक्षण केलं पूर्ण; शेतकऱ्याचा मुलगा असा बनला IAS अधिकारी !
IAS वीर
Image Credit source: instagram
| Updated on: Jun 12, 2023 | 12:04 PM

Success Story of IAS Officer : UPSC सारख्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कहाणी खूप प्रेरणादायी असते. काही लोकं या परीक्षेच्या तयारीसाठी लाखो रुपये खर्च करताना दिसतात. त्याचवेळी आयएएस अधिकारी वीर प्रताप राघव यांचे नाव समोर येते, ज्यांनी कर्ज घेऊन यूपीएससीची तयारी केली. त्यांना त्यांच्या कठोर मेहनतीचे फळ मिळाले आणि ते आयएएस झाले.

अपयशाला न घाबरता जे लोक सतत प्रयत्न करतात, तेच लोक त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होतात. आयएएस अधिकारी वीर प्रताप सिंह राघव हे तामिळनाडूमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून तैनात आहेत. त्यांची यशोगाथा लाखो तरुणांना प्रेरणा देणारी आहे.

तिसऱ्या प्रयत्नात झाले IAS

उत्तर प्रदेशातील दलपतपूर गावचे मूळ रहिवासी असलेले वीर प्रताप सिंह राघव यांनी तिसऱ्या प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी 92 वा क्रमांक पटकावला. करौरा येथील आर्य समाज शाळेत वीर प्रताप यांनी प्राथमिक शिक्षण घेतले तर, शिकारपूरमधील सूरजभान सरस्वती विद्या मंदिर शाळेतून पुढील शिक्षण पूर्ण केले.

प्राथमिक शाळेत जाण्यासाठी वीर प्रताप यांना घरापासून पाच किलोमीटर चालत जावे लागे. अभ्यासासाठी त्यांना दररोज जाऊन येऊन 10 किमी प्रवास करावा लागत होता. गावात पूल नसताना ते नदीतून मार्ग काढून जात असत. ते अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. 2015 मध्ये वीर प्रताप यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये B.Tech ची पदवी मिळवली.

मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी काढलं कर्ज

वीर प्रताप सिंह राघव हे शेतकऱ्याचा मुलगा असून त्यांनी लहानपणापासूनच गरिबी अनुभवली होती. तरीही त्यांच्या शिकण्याच्या इच्छेने त्यांना आयएएस होण्यास प्रवृत्त केले. वीर प्रताप यांच्या मोठ्या भावालाही आयएएस व्हायचे होते, कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांनी सीआरपीएफमध्ये सेवा करण्याचे ठरवले. वीरच्या अभ्यासासाठी, त्याच्या वडिलांनी वीर प्रतापच्या यूपीएससीच्या तयारीसाठी व्याजावर पैसे घेतले.