AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICAI CA Exams 2021: सीएच्या परिक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, आयसीएआयला दिलासा, कोर्टात नेमकं काय घडलं?

सुप्रीम कोर्टानं चार्टड अकाऊंटंटच्या परीक्षा घेणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटंसला जुलै 2021 च्या फायनल, इंटरमिजिएट आणि आयपीसी आणि आयक्यूसी परीक्षांच्या आयोजनाला परवानगी दिली आहे.

ICAI CA Exams 2021: सीएच्या परिक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, आयसीएआयला दिलासा, कोर्टात नेमकं काय घडलं?
supreme court
| Edited By: | Updated on: Jun 30, 2021 | 2:59 PM
Share

ICAI CA July Exams Opt-Out नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं चार्टड अकाऊंटंटच्या परीक्षा घेणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटंसला जुलै 2021 च्या फायनल, इंटरमिजिएट आणि आयपीसी आणि आयक्यूसी परीक्षांच्या आयोजनाला परवानगी दिली आहे. मात्र, कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑप्ट आऊटची सुविधा देण्यासह काही नियमांमध्ये बदल देखील केले आहेत. सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती एम. ए.खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या बेंच समोरी ही सुनावणी झाली. एखादा विद्यार्थी किंवा त्याचे पालक परीक्षा काळात कोरोनाबाधित झाल्यास त्यांना डॉक्टरांचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. आयसीएआय त्याची पडताळणी करेल. (Supreme Court of India Allows ICAI To Hold CA Exams From July 5)

आरटीपीसीआर टेस्टपासून दिलासा

सुप्रीम कोर्टात परीक्षा स्थगित करणे, ऑप्ट-ऑऊट पर्याय परीक्षा केंद्र, परीक्षेची संधी यासंदर्भात सुनावणी सुरु होती. एखाद्या विद्यार्थ्याला डॉक्टरांकडून कोरोना झाल्याचं प्रमाणपत्र मिळाल्यालनंतर आरटीपीसीआर रिपोर्ट सादर करण्याची गरज नाही, असा निर्णय कोर्टानं दिला आहे. यापूर्वी आयसीएआयनं आरटीपीसीआर रिपोर्ट सादर करणं बंधनकारक केलं होतं.

सुप्रीम कोर्टानं आयसीएआयच्या सीए परिक्षेसंदर्भात निकाल देताना एखादा विद्यार्थी कोरोनाबाधित झाला किंवा एखाद्या पेपरला उपस्थित राहण्यास शक्य नसल्यास त्याला ऑप्ट आऊटचा पर्याय देण्यात यावा,असा आदेश दिला आहे.

सुप्रीम कोर्टानं आयसीएआयला परीक्षा केंद्र अखेरच्या वेळी बदल केल्यास उमेदवाराला ऑप्ट आऊटची सुविधा उपलब्ध करुन देण्यास सांगण्यात आलं आहे. आयसीआयनं विद्यार्थ्यांनी शहरातील परीक्षा केंद्र बदलल्यास त्यांना ऑप्ट-आऊटचा वापर करण्यास करण्यास मनाई केली होती. मात्र, आता अशा विद्यार्थ्यांना देखील ऑप्ट आऊट सुविधा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं मिळणार आहे.

परीक्षा कधी होणार?

सीए फायनलची परीक्षा 5 जुलै ते 19 जुलै दरम्यान होईल. CA फायनल (जुना अभ्यासक्रम) ग्रुप 1 ची परीक्षा 5, 7, 9 आणि 11 जुलैला आयोजित केली जाईल. सीए फायनल (जुना अभ्यासक्रम) ग्रुप 2ची परीक्षा 13, 15, 17 आणि 19 जुलै या काळात आयोजित केली जाईल. आईसीएआयनं 5 ते 20 जुलैदरम्यान इंटरमिजिएट (आईपीसी) आणि इंटरमिजिएट (नवा अभ्यासक्रम) ची परीक्षा आयोजित केली जाईल. विमा आणि जोखीम व्यवस्थापन (IRM) तंत्रत्रान परीक्षा आणि आंतरराष्ट्रीय कर (INTT-AT) ही परीक्षा 5, 7, 9 आणि 11 जुलै रोजी आयोजित केली जाईल.

संबंधित बातम्या:

CAI कडून CA परीक्षेसाठी नवी घोषणा, विद्यार्थ्यांना नव्यानं करावं लागणार ‘हे’ काम

युजीसीचा मोठा निर्णय, सीएच्या डिग्रीला आता पदव्युत्तर शिक्षणाची मान्यता

(Supreme Court of India Allows ICAI To Hold CA Exams From July 5)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.