युजीसीचा मोठा निर्णय, सीएच्या डिग्रीला आता पदव्युत्तर शिक्षणाची मान्यता

युजीसीने सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए शिक्षणाला पदव्युत्तर शिक्षणाची मान्यता दिली आहे. चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) विनंतीवरून युजीसीने हा मोठा निर्णय. (UGC's big decision, CA degree now recognized postgraduate education)

युजीसीचा मोठा निर्णय, सीएच्या डिग्रीला आता पदव्युत्तर शिक्षणाची मान्यता
सीएच्या डिग्रीला आता पदव्युत्तर शिक्षणाची मान्यता

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आयसीएआय सीएच्या म्हणजेच चार्टर्ड अकाऊंटसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर दिली आहे. युजीसीने चार्टर्ड अकाउंटन्सीच्या शिक्षणाला पदव्युत्तर शिक्षणाची मान्यता दिली आहे. चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) विनंतीवरून युजीसीने हा मोठा निर्णय घेतला आहे. (UGC’s big decision, CA degree now recognized postgraduate education)

युजीसीच्या या निर्णयामुळे सीएच्या उमेदवारांना उच्च अभ्यास घेण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवर भारतीय सीएची गतिशीलता अधिक सुलभ होणार आहे. युजीसीने हा दावा केला आहे. आयसीएआयचे सीसीएम धीरज खंडेलवाल यांनी या निर्णयासंबंधी ट्विट केले. युजीसीने सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए शिक्षणाला पदव्युत्तर शिक्षणाची मान्यता दिली आहे. ही आमच्या व्यवसायासाठी मोठी ओळख आहे, असे खंडेलवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सीएच्या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी आयसीएआयची स्थापना

आयसीएआय ही एक वैधानिक संस्था आहे. ही संस्था देशातील चार्टर्ड अकाउंटन्सीच्या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी 1949 मधील सनदी लेखाकार कायद्याखाली स्थापन करण्यात आली होती. सध्या या संस्थेचे 3 लाखांहून अधिक सदस्य आहेत. सीए शिक्षणामध्ये उच्चतम दर्जा राखण्याची जबाबदारी आयसीएआयवर आहे. ज्या विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटन्सीचा व्यवसाय करायचा असेल, त्याने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा दिल्यानंतर आयसीएआयच्या फाऊंडेशन कोर्ससाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

जूनमध्ये होणार सीए परीक्षा

सीए फाउंडेशन परीक्षा 24, 26, 28 आणि 30 जून 2021 रोजी घेण्यात येईल. आयसीएआय सीए फाउंडेशन परीक्षा 2021 ची नोंदणी प्रक्रिया 20 एप्रिल 2021 पासून सुरू होईल आणि 4 मे रोजी बंद होईल. सीए फाउंडेशन परीक्षा 2021 पेपर 1 व 2 साठी दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या वेळेत घेण्यात येईल. पेपर 3 आणि 4 दुपारी 2 ते सायंकाळी 4 या वेळेत घेण्यात येईल.

सीए परीक्षा नोंदणी फी

इच्छुक उमेदवार अंतिम मुदतीपूर्वी अधिकृत वेबसाईट icaiexams.icai.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. भारतीय केंद्रांतील उमेदवारांसाठी अर्ज फी 1500 रुपये आहे. काठमांडू वगळता इतर परदेशी केंद्रांसाठी फी 325 अमेरिकी डॉलर आहे. काठमांडू (नेपाळ) केंद्रांमधील उमेदवारांसाठी फी 2200 रुपये आहे. उशिरा 4 मे नंतर आणि 7 मे पूर्वी फी अर्ज करण्यांना 600 रुपये दंड भरावा लागेल. त्याचप्रमाणे परदेशी केंद्राच्या उमेदवारांना 10 युएस डॉलर उशीरा दंड भरावा लागेल. (UGC’s big decision, CA degree now recognized postgraduate education)

इतर बातम्या

NCDC Recruitment 2021 : राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळात शासकीय नोकर्‍या, 30 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले

Gold Rate Today: सोने पुन्हा एकदा महागले, चांदीचाही भाव वाढला; पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI