NEET UG 2024: नीट याचिकेवर सर्वोच्च न्यायालय कठोर, सरकारला सुनावले खडे बोल, कोर्ट रुममध्ये काय घडले…

NEET UG 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला त्याच दिवशी 4 जून रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीटचा निकाल जाहीर केला होता. त्यात धक्कादायक बाब म्हणजे 67 उमेदवारांना 720 पैकी 720 गुण मिळले. नीटमध्ये इतके गुण मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे.

NEET UG 2024: नीट याचिकेवर सर्वोच्च न्यायालय कठोर, सरकारला सुनावले खडे बोल, कोर्ट रुममध्ये काय घडले...
Follow us
| Updated on: Jun 18, 2024 | 1:47 PM

NEET UG 2024: ‘नीट’ परीक्षेच्या निकालावरून सध्या देशभरातील विद्यार्थी अस्वस्थ झाले आहेत. या विषयावरुन मोठे वादळ देशात निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांना मिळालेले भरपूर गुण पेपरफुटीमुळे मिळाले की काय, याची चर्चा होऊ लागली आहे. निकालातील ही हेराफेरीनंतर पालक अन् विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आहे. या प्रकरणात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि एनटीएला फटकारले आहे. कोणाकडून 0.001% टक्के निष्काळजीपणा झाला असेल, तरी सहन केला जाणार नाही. मुलांनी परीक्षेची तयारी केली आहे, त्यांची मेहनत आम्ही विसरू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाने काय म्हटले…

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि एनटीएला म्हटले आहे की, नीट विरुद्ध दाखल केलेल्या याचिकांना विरोध समजू नका. या परीक्षेच्या आयोजन करण्यात काही चूक झाली असेल तर ती स्वीकारा आणि त्यात सुधारणा करा. नीट पेपर लीक आणि या प्रकरणाचा सीबीआय तपास करण्याचा मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने पुढील तारीख दिली आहे. या प्रकरणाची सुनावणी 8 जुलै रोजी होणार आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी काय घडले…

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला त्याच दिवशी 4 जून रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीटचा निकाल जाहीर केला होता. त्यात धक्कादायक बाब म्हणजे 67 उमेदवारांना 720 पैकी 720 गुण मिळले. नीटमध्ये इतके गुण मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे. 11 जून रोजी तीन याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला नोटीस बजावली होती. तसेच नीटची सुरु असलेली काउंसलिंग प्रक्रिया थांबवण्यास नकार दिला होता. त्यानंतर 13 जून रोजी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितले होते की, ग्रेस गुण मिळालेल्या 1563 उमेदवारांचे स्कोअरकार्ड रद्द केले जातील. तसेच स्कोअर कार्ड ग्रेस गुणांशिवाय दिले जातील.

कोर्ट रुममध्ये नेमके काय घडले

  • न्यायमूर्ती नाथ (वकिलाला) : तुम्ही 8 तारखेला सर्व विषयांवर बोलू शकतात.
  • याचिकाकर्त्याचे वकील: मला फक्त तपास कोणत्या टप्प्यापर्यंत आला आहे, त्याची माहिती पाहिजे.
  • न्यायमूर्ती नाथ: या खटल्यातील याचिकांशी संबंधित सर्व पक्षकार जोडले जावेत, 8 जुलै रोजी यादी तयार करा. NTA आणि सरकार देखील 2 आठवड्यात उत्तर देईल.
  • न्यायमूर्ती भट्टी : कोणी निष्काळजीपणा केला असेल तर त्याच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे.
  • याचिकाकर्ता : त्यांनी तपास रेकॉर्डवर ठेवावा.
  • न्यायमूर्ती भट्टी: पुढील सुनावणीत तुम्ही सर्व खुलासे करू शकता.
Non Stop LIVE Update
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका.
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान.
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय.
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?.
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'.
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप.
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची...
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची....
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्.
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?.