TET Exam Scam : म्हाडा, टीईटी ,आरोग्य भरतीतील गैरप्रकार भोवणार, आरोपींवर लाचलुचपतचं कलम लागणार?

| Updated on: Feb 01, 2022 | 10:05 AM

विद्यार्थ्यांनी टीईटी घोटाळ्याचा तपास पुणे पोलिसांकडेच ठेवा, अशी मागणी केलीय. एटीएस किंवा अन्य तपास शाखेकडे तपास देऊ नका अशी मागणी करणार पत्र विद्यार्थ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे.

TET Exam Scam : म्हाडा, टीईटी ,आरोग्य भरतीतील गैरप्रकार भोवणार, आरोपींवर लाचलुचपतचं कलम लागणार?
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुणे सायबर पोलिसांना (Pune Cyber Police) आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेतही गैर प्रकार (TET Exam Scam) झाल्याचे धागेदोरे हाती लागले होते. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe), माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख आणि आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर याच्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे. म्हाडा, आरोग्य आणि टीईटी प्रकरणातील आरोपींच्या मालमत्तेची चौकशी होणार आहे. पेपरफुटीप्रकरणी लाचलुचपतची कलमं लावण्यात येणार आहेत. म्हाडा, आरोग्य आणि टीईटी प्रकरणातील आरोपींच्या मालमत्तेची चौकशी होण्याची शक्यता असल्यानं आरोपींच्या अडचणी वाढणार असल्याचे संकेत आहेत. या तिन्ही प्रकरणात आत्तापर्यंत 30 पेक्षा जणांना अटक करण्यात आलीय. सरकारी पदाचा गैरवापर करून मालमत्ता मिळवल्याने आरोपींवर लाचलुचपतचे कलम लागणार असल्याचं कळतंय.

लाचलुचपतचं कलम लागणार?

म्हाडा, आरोग्य आणि टीईटी प्रकरणातील आरोपींच्या मालमत्तेची चौकशी होणार असल्याचं कळतंय. पेपरफुटीप्रकरणी लाचलुचपतचे कलम लागणार असल्याचे संकेत मिळत आहेतया तिन्ही प्रकरणात आत्तापर्यंत 30 हून सरकारी पदाचा गैरवापर करून मालमत्ता मिळवल्याने आरोपींवर लाचलुचपतचे कलम लागणार आहे.

टीईटी परीक्षेचा तपास पुणे पोलिसांकडेच ठेवा

विद्यार्थ्यांनी टीईटी घोटाळ्याचा तपास पुणे पोलिसांकडेच ठेवा, अशी मागणी केलीय. एटीएस किंवा अन्य तपास शाखेकडे तपास देऊ नका अशी मागणी करणार पत्र विद्यार्थ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे.पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पुणे सायबर पोलीस या प्रकरणाचा चांगला तपास करत आहेत. त्यामुळे पत्र लिहून विद्यार्थ्यांनी ही मागणी केली.

नांदेडच्या 222 शिक्षकांची टीईटी प्रमाणपत्र पडताळणीसाठी

नांदेड जिल्ह्यातील 222 शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र पडताळणीसाठी परीक्षा परिषदेकडे पाठवले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिकच्या 97 तर माध्यमिक विभागाच्या 125 शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठवले आहे. टीईटी परीक्षेत झालेला गैर व्यवहार उघड झाल्याने फेब्रुवारी 2013 नंतर टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील साडेतीनशे गुरुजींच्या प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा परिषदेत नोकरीला असलेल्या गुरुजी लोकांनी सध्या देव पाण्यात ठेवले आहेत. दरम्यान, टीईटी परीक्षेत गैरव्यवहार आढळल्याने नुकत्याच झालेल्या परीक्षेचा निकाल रखडल्याने परीक्षार्थी संभ्रमात आहेत.

इतर बातम्या:

TET Exam Scam | सनदी अधिकारी सुशील खोडवेकर यांना ठाण्यातून अटक; पुणे सायबर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई

TET Exam Scam| TET परीक्षेत पैसे देऊन 7 हजार 800 परीक्षार्थी पास, पुणे सायबर पोलिसांच्या तपासात समोर

TET Mhada Health department exam scam anti corruption act will imposed against accused said by sources